Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून नाव कट झाले? एका मिनिटात असे करा चेक

Ladki Bahin Yojana Installment Update: लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांचे योजनेच्या यादीतून नाव कट झाले असेल तर त्यांनी चिंता करण्याचे कारण नाही. घरबसल्या काही मिनिटात ते चेक करू शकतात.
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून नाव कट झाले? एका मिनिटात असे करा चेक
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On
  • लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांची नावे वगळण्यात आली आहेत

  • ई-केवायसी अपूर्ण असल्यास हप्ता बंद होऊ शकतो

  • लाभार्थी स्थिती अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन तपासा

  • आधार आणि बँक तपशीलातील तफावत हेही एक मोठे कारण

महाराष्ट्र सरकारची महत्वकांक्षी मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेचा मार्च आणि एप्रिल महिन्याचे हफ्ता लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा झाला आहे. लाडक्या बहिणी आता मे महिन्याच्या हफ्त्याचे पैसे कधी येणार याची वाट पाहत आहेत. मे महिना संपत आला तरी हप्ता न आल्याने लाडक्या बहिणी चिंतेत आहेत. सरकारने लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी अनेक वेळा मुदत वाढ दिली होती. ही मुदत संपल्यानंतर अनेक अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींची नावं या योजनेतून काढून टाकण्यात आली. अशामध्ये आता लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये जर तुमचे नाव कट झाले असेल तर करायचे हे आपण जाणून घेणार आहोत...

सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजनेअंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा १,५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. सरकारने ई-केवायसी आणि पुनर्तपासणी प्रक्रिया सुरू केल्यामुळे लाखो महिलांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. सरकारने ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम मुदत अनेक वेळा वाढवली. लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवण्यात आली. ज्या महिलांचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे, त्यांना एप्रिल २०२६ चा हप्ता मिळत आहे. ज्यांचे ई-केवायसी अपूर्ण आहे किंवा अर्जात काही चूक आढळली आहे त्यांचे हप्ते थांबवण्यात आळे आहे. सरकारने केलेल्या फेरतपासणीनंतर, यादीतून सुमारे ७० लाख महिलांची नावे वगळण्यात आली.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून नाव कट झाले? एका मिनिटात असे करा चेक
Ladki Bahin Yojana: अपात्र ठरलेल्या महिला पात्र ठरणार, १५०० रुपये पुन्हा मिळणार; कसं ते जाणून घ्या

तुम्हाला मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेतून वगळले जाण्याची अनेक कारणे आहेत. यामध्ये अपूर्ण ई-केवायसी, अर्जामधील चुकीची माहिती, आधार आणि बँक तपशिलांमधील तफावत, उत्पन्न किवा मालमत्तेच्या पात्रतेचे निकष पूर्ण न करणे आणि सरकारी चौकशीदरम्यान अपात्र आढळणे यांचा समावेश आहे. ज्या महिलांचे ई-केवायसी पूर्ण झाले नाही त्यांची नावं या योजनेतून काढून टाकण्यात आली आहेत. त्यांना यापुढे १५०० रुपये हफ्ता दरमहा मिळणं बंद झाले आहे.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून नाव कट झाले? एका मिनिटात असे करा चेक
Ladki Bahin Yojana : ई-केवायसी राहिलेल्या 'लाडक्या बहिणीं'साठी महत्त्वाची बातमी, सरकारनं स्पष्ट शब्दात सांगितले, वाचा

लडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून नाव वगळण्यामागे काय कारणं?

1. ई-केवायसी पूर्ण न करणे

2. अर्जामध्ये चुकीची माहिती

3. आधार आणि बँक तपशिलांमध्ये तफावत

4. उत्पन्न किंवा मालमत्तेच्या पात्रतेचे निकष पूर्ण न करणे

5. इतर सरकारी योजनांमुळे अपात्र घोषित होणे

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून नाव कट झाले? एका मिनिटात असे करा चेक
Ladki Bahin Yojana : मार्च-एप्रिलचे ₹३००० खात्यात जमा, आता मे महिन्याचे ₹१५०० कधी? संभाव्य तारीख आली समोर

जर लाडकी बहीण योजनेतून तुमचे नाव हटवले गेले असल्यास घाबरण्याची गरज नाही. तुम्ही खालील स्टेप्स फॉलो करून ते चेक करू शकता. यासाठी तुम्हाला ऑनलाइन स्थिती चेक करावी लागेल. योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुमच्या अर्जाची स्थिती तपासा. जर त्यावर 'नाकारले' किंवा 'काढून टाकले' असे लिहिले असेल तरर त्याचे कारण नोंदवून घ्या.

अधिकृत वेबसाइटवर लॉगिन कसे करावे?

1. अधिकृत वेबसाइट https://ladakibahin.maharashtra.gov.in/ वर जा.

2. "अर्जदार लॉगिन" वर क्लिक करा

3. मोबाईल नंबर किंवा अॅप्लिकेशन आयडी प्रविष्ट करा

4. पासवर्ड आणि कॅप्चा प्रविष्ट करा

5. लॉग इन करा आणि "लाभार्थी स्थिती" वर क्लिक करा.

घर बसल्या ई-केवायसी कसे तपासावे?

1. अधिकृत पोर्टल उघडा

2. "ई-केवायसी पडताळणी" पर्याय निवडा

3. आधार क्रमांक आणि कॅप्चा प्रविष्ट करा

4. ओटीपी प्राप्त करा आणि सबमिट करा

5. स्थिती स्क्रीनवर दिसेल

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून नाव कट झाले? एका मिनिटात असे करा चेक
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा फटका अनाथ मुलांना, निधी वळवल्यामुळे १२ महिन्यांपासून लाखो मुलांना लाभ नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com