

करदात्यांसाठी महत्वाची बातमी
आयटीआर फाइल करण्याची तारीख वाढणार का?
उशिरा ITR भरल्यास किती दंड
करदात्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी ITR भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी आयकर विभागाने ITR-1 आणि ITR- 4 हे फॉर्म ऑनलाइन आणि ऑफलाइनपद्धतीत उपलब्ध केले आहेत. मात्र सध्या करदात्यांमध्ये फॉर्म भरण्याचा मुदतीवरून अनेक संभ्रम निर्माण झाले आहे. याची शेवटी तारीख ही ३१ जुलै असते. पण यंदा मुदत वाढवून मिळणार का? असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला आहे.
आता करदाते कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक, फ्रीलान्सर आणि छोटे उद्योजक ई- फायलिंग पोर्टलच्या मदतीने आयटीआर फाइल करू शकतात. याचा दंड भरावा लागू नये म्हणून दिलेल्या मुदतीआधी आयटीआर रिटर्न भरणं गरजेचं आहे. ही मुदत ३१ जुलै आहे. यामध्ये प्रत्येक कॅटेगरीनुसार आयटीआर फाइल करण्याची डेडलाइनही वेगवेगळी असते.
इथे करदाते हिंदू अविभाजित कुटुंब (HUF) कुटुंबाचं खातं ऑडिटच्या विभागात येत नाही. तर त्यांच्यासाठी ITR फाइलिंग तारीख ही ३१ जुलै २०२६ आहे. दुसरीकडे Association of Persons आणि Body of Individuals यांनासुद्धा हीच तारीख देण्यात आली आहे. जे लोक प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन योजनेअंतर्गत व्यवसाय किंवा उत्पन्न दाखवतात, ज्यांना ऑडिटची गरज नाही अशां करदात्यांनाही ३१ जुलै २०२६ जुलैपर्यंत रिटर्न भरावा लागेल.
ज्या व्यवसायांचे खाते ऑडिट करणे बंधनकारक आहे, त्यांना ITR भरण्यासाठी जास्तीचा कालावधी देतात. अशा करदात्यांसाठी शेवटी मुदत ही ३१ ऑक्टोबर २०२६ आहे. कारण ऑडिट रिपोर्ट पूर्ण केल्यावरच त्यांना रिटर्न भरता येतो. त्यामुळे या विभागाला ३१ जुलैनंतर तीन महिन्यांची मुदत वाढवून मिळते.
जेव्हा तुम्ही ITR भरण्याची शेवटची तारीख चुकवता तेव्हा बिलेटेड ITR भरता येतो. पण कलम २३४F अंतर्गत दंड आकारला जातो. सामान्य करदात्यांना ५००० रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. मात्र जर वार्षिक उत्पन्न ५ लाखांपेक्षा कमी असेल तर कमाल अंदाजे १००० रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट न पाहता लवकरात लवकर ITR भरावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.