Ladki Bahin Yojana: मे महिना संपत आला, लाडक्या बहिणींना हप्ता कधी येणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Ladki Bahin Yojana May-june Installment Date: लाडकी बहीण योजनेचे मार्च-एप्रिल महिन्याचा १५०० चा हप्ता खात्यात जमा झाला आहे. ई- केवायसी न केलेल्या महिलांना लाभ मिळालेला नाही.
Ladki Bahin Yojana May-june Installment Date
Ladki Bahin Yojana google
Published On
Summary

लाडक्या बहिणींसाठी महत्वाची माहिती समोर आली

मार्च- एप्रिलचा हप्ता खात्यात जमा

किती महिला पात्र, किती अपात्र

महाराष्ट्र सरकारच्या मुख्मंत्री लाडकी बहीण योजनेचा अनेक महिलांना लाभ मिळतो. दर महिन्याचा हप्ता थेट महिलांच्या खात्यामध्ये पाठवला जातो. मार्च - एप्रिल महिन्याचा हप्ता खात्यात जमा झालेला आहे. आता मे महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू आहे. तर लाभार्थी महिलांच्या मनात मे महिन्याचा हप्ता कधी येणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पुढील माहितीत आपण याबद्दल महत्वाची अपडेट जाणून घेणार आहोत.

मार्च-एप्रिलचा हप्ता जमा

आता लाडकी बहीण योजनेचा १५०० चा मार्च-एप्रिलचा हप्ता लाभार्थी महिलांना मिळालेला आहे. मात्र यामध्ये ई-केवायसी (e-kyc) न केलेल्या महिलांना याचा लाभ घेता आलेला नाही. तसेच फक्त पात्र महिलांनाच याचा हप्ता मिळणार आहे. ई-केवायसी केल्यानंतर ७० लाख महिला या अपात्र ठरल्या. त्यांचा हप्ता सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतला.

Ladki Bahin Yojana May-june Installment Date
WhatsApp युजर्ससाठी गुड न्यूज! आता मोबाईल नंबरशिवाय करता येणार चॅटींग, जाणून घ्या सोपी ट्रिक

लाडकीचा मे महिन्याचा हप्ता कधी येणार?

लाडक्यांना आता पुढील हप्ता कधी येणार याची चिंता लागली आहे. तर याचा हप्ता १० जून ते १५ जून या दरम्यान येतील असा अंदाज आहे. याचे पैसे ई-केवायसी केलेल्या महिलांच्या खात्यात पाठवले जातील. तर ज्या महिला अपात्र आहेत. त्यांना पैसे मिळणार नाहीत. याआधी सरकारने महिलांना ई-केवायसी करण्याची सक्ती केली होती. त्यामध्ये काही महिलांना ती करता आली नाही. म्हणून पुन्हा यामध्ये याच्या मुदतीत वाढ करण्यात आली होती. ३१ एप्रिल ही ई-केवायसीची शेवटची तारीख होती.

पात्र-अपात्र लाडक्या बहिणी

लाडकी बहीण योजनेचा आकडा हा अडीच कोटींचा होता. त्यातील ७० लाख महिला या अपात्र ठरल्या असून १ कोटी ७७ लाख महिला या पात्र ठरल्या. कारण त्यातील काही महिलांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला होता. त्यांच्यावर कारवाई केली जाणार असं मंत्री आदिती तटकरे यांनी माध्यमांना सांगितलं.

Ladki Bahin Yojana May-june Installment Date
Petrol Diesel Price Hike : मुंबईकरांवर आर्थिक संकट! पेट्रोल ₹१०८, डिझेल ₹९५; ऑटो-टॅक्सीचा प्रवासही महागणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com