PM Kisan Yojana: पीएम किसानचा हप्ता जमा, कोल्हापूरातील ११ हजार शेतकऱ्यांना ₹२००० मिळालेच नाही; हे काम लगेच करा

PM Kisan Yojana 22nd Installment Update: पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता जमा केला आहे. कोल्हापूरातील ११ हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केलेले नाहीत. यामागे अनेक कारणे आहेत.
PM Kisan Yojana
PM Kisan YojanaSaam Tv
Published On
Summary

पीएम किसानचा हप्ता जमा

कोल्हापूरातील ११ हजार शेतकरी लाभापासून वंचित

हे काम आताच करा

केंद्र सरकारने पीएम किसान योजना सुरु केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना वर्षाला ६००० रुपये दिले जातात.पीएम किसान योजनेत नुकताच २२वा हप्ता जमा करण्यात आला आहे.शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा केले आहेत. यामध्ये राज्यातीलदेखील लाखो शेतकऱ्यांना हप्ता मिळालेला आहे. दरम्यान, अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही.

PM Kisan Yojana
Namo Shetkari Yojana: ९४ लाख शेतकऱ्यांसाठी खुशखबर! १० दिवसात खात्यात जमा होणार ₹४०००

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील ४ लाख ६४ हजार ८६९ लाभार्थ्यांना पैसे मिळाले आहेत. दरम्यान, ११ हजार ५४८ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही. या शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा २२वा हप्ता जमा झालेला नाही. हे पैसे का जमा झाले नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे.

पीएम किसानचा हप्ता जमा न होण्यामागचे कारण

पीएम किसानचा हप्ता जमा न होण्यामागचे मूख्य कारण म्हणजे निकष. ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केले आहे त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. ईकेवायसी, आधार सीडिंग न केल्याने शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. वारंवार आवाहन करुनदेखील शेतकऱ्यांनी ईकेवायसीचे काम केले नाही त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. कृषी विभागाने आधीच सांगितले होते की, ईकेवायसी आणि बँक खाते आणि आधार कार्ड लिंक असणे अनिवार्य आहे. हे काम केले असेल तरच शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी हे काम केले नाही त्यांना २२वा हप्ता मिळालेला नाही.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana: ९.३२ कोटी शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आज खात्यात जमा होणार ₹२००० ; त्याआधीच कृषीमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

कृषी विभागाने केले आवाहन

शेतकऱ्यांना यापुढे कोणत्याही अडथळ्याशिवाय लाभ घेण्यासाठी ही कामे करायचे आहे. कोल्हापूरातील ११ हजार ५४८ शेतकऱ्यांनी केवायसी करायची आहे. केवायसी, लँड आणि आधार सीडिंगची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. त्यानंतरच इथून पुढचा लाभ मिळत राहणार आहे.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana: पीएम किसानचे ₹२००० आले नाहीत? अशा पद्धतीने करा तक्रार; लगेच खात्यात जमा होतील पैसे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com