PM Kisan Yojana : एका चुकीमुळे शेतकऱ्यांचे २००० रुपये अडकणार; आताच करा 'ही' २ कामे

PM Kisan Samman Nidhi Yojana :पीएम किसान सन्मान निधी योजनेसंदर्भातील महत्वाची बातमी हाती आली आहे. या निधीसाठी शेतकऱ्यांना दोन महत्वाची कामे करावी लागणार आहे. यात ई-केवायसी आणि जमीन पडताळणीचा समावेश आहे.
PM Kisan Yojana
एका चुकीमुळे शेतकऱ्यांचे २००० रुपये अडकणार; आताच करा 'ही' २ कामे Saam tv
Published On

नवी दिल्ली : पीएम किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये मिळतात. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी आणि जमीन पडताळणी करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी हे महत्वाचं काम न केल्यास १८ वा हप्ता रखडण्याची शक्यता आहे. या योजनेचा १८ वा हप्ता ऑक्टोबर महिन्यात मिळण्याची शक्यता आहे.

या योजनेसाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी आणि जमीन पडताळणी लवकरात लवकर करावी लागणार आहे. या योजनेची अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in वर भेट देऊन हे काम करावे लागणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ६ हजार रुपये दिले जातात. २-२ हजारांचे तीन हप्ते दिले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन काम करणे गरजेचे आहे. नव्या लाभार्थींसाठी ई-केवायसी करणे गरजेचे आहे. ई-केवायसी न केल्यास शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे.

PM Kisan Yojana
Farmer Success Story : सेंद्रिय पद्धतीने रानभाजीचा केला यशस्वी प्रयोग; कर्टुले लागवडीतून चार महिन्यात ३ लाख ७५ हजाराचे उत्पादन

ई-केवायसीची प्रक्रिया महत्वाची

ई-केवायसीच्या प्रक्रियेच्या माध्यमातून आधारकार्ड आणि मोबाईल नंबरच्या आधारे ओळखीची पुष्टी करु शकतात. ई-केवायसी तुम्ही घरी बसल्या-बसल्या ऑनलाइन पद्धतीने करू शकतात. तसेच घराजवळच्या सीएससी केंद्रावर जाऊनही ई-केवायसी करू शकतात. यासाठी ई-केवायसी फॉर्म भरावा लागणार आहे. बायोमेट्रिक पद्धतीने ओळखीची पुष्टी करू शकतात.

जमिनीची पडताळणी गरजेची

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसीसोबत जमिनीची पडताळणी करणे गरजेचे आहे. या दोन बाबी न केल्यास तुमचा १८ वा हप्ता रखडण्याची शक्यता आहे. या विभागाच्या वतीनेही दोन्ही कामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

PM Kisan Yojana
PM Vishwakarma Yojana: तरुणांना व्यावसायिक होण्याची सुवर्णसंधी! सरकार देतंय ३ लाखांचं कर्ज, काय आहे पीएम विश्वकर्मा योजना?

योजनेचा १८ वा हप्ता केव्हा मिळणार?

पीएम किसान योजनेचा १७ वा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला आहे. आता या योजनेचा १८ वा हप्ता ऑक्टोबर महिन्यात मिळण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळते. देशभरातून कोट्यवधी शेतकरी या योजनेचा लाभ घेतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com