Crop Insurance : परभणी जिल्ह्यातील अनेक शेतकरी पीक विम्याच्या मोबदल्यापासून वंचित; तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांनाच मिळाला लाभ

Parbhani News : परभणी जिल्ह्यात मागील वर्षीच्या खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. पीक विमा उतरविलेल्या अनेक शेतकऱ्यांना याची नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित होते
Crop Insurance
Crop InsuranceSaam tv
Published On

परभणी : परभणी जिल्हात गतवर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीसंदर्भात विमा कंपनीकडे केवळ तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांनाच मोबदला अदा केला आहे. मात्र उर्वरित शेतकरी मात्र पीक विम्याच्या लाभापासून अद्यापपर्यंत वंचित राहिले आहेत. यामुळे आता या शेतकऱ्यांना कधी मोबदला मिळेल हा प्रश्न उपस्थित होत आहे. 

Crop Insurance
Dhule News : पांझरा नदीत वाहून जाणाऱ्या वृद्धास वाचविले; आपत्ती व्यवस्थापनच्या जवानाचे तात्काळ बचाव कार्य

परभणी (Parbhani) जिल्ह्यात मागील वर्षीच्या खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. पीक विमा उतरविलेल्या अनेक शेतकऱ्यांना याची नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित होते. मात्र जिल्ह्यात ४०६ कोटी ७१ लाख रुपयांचे कापूस, तूर, उडीद व सोयाबीन नुकसान प्रकरण करण्यात आले आहे. मात्र पिकांचे नुकसान होऊनही केवळ तक्रार न केल्याने बहुतांश शेतकरी (Farmer) मदतीपासून वंचित राहिले आहेत. याबाबत मात्र लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

Crop Insurance
Nandurbar Rain : संततधार पावसामुळे घर कोसळले; कुटुंबातील चार सदस्य जखमी, दोन गाई दगावल्या

यामध्ये पीक कापणी प्रयोग, स्थानिक नैसर्गिक आपत्ती व सोयाबीन अग्रीम रकमेचा समावेश आहे. परंतु दुसरीकडे केवळ तक्रार न केलेले अनेक शेतकरी विम्याच्या (Crop Insurance) प्रतीक्षेत आहेत. विमा कंपनीने सकारात्मकतेची भूमिका घेत संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी अशी मागणी होत आहे. नवीन खरीप हंगाम सुरु झाला असून मागील हंगामातील नुकसानीची भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com