PM Kisan Mandhan Yojana: खुशखबर! शेतकऱ्यांना दर महिन्याला मिळणार ₹३०००; पीएम किसान मानधन योजना आहे तरी काय?

PM Kisan Mandhan Yojana For Farmers: केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी खास पीएम किसान मानधन योजना सुरु केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना दर महिन्याला ३००० रुपये मिळणार आहेत.
PM Kisan Yojana
PM Kisan YojanaSaam Tv
Published On
Summary

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची खास योजना

पीएं किसान मानधन योजनेचा मिळणार लाभ

दर महिन्याला मिळणार ३००० रुपये

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यातील एक योजना म्हणजे पीएम किसान मानधन योजना. पीएम किसान मानधन योजनेत शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. शेतकऱ्यांना शेतीच्या उपयोगी साधने खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. जेणेकरुन त्यांना कोणतीही अडचण येणार आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळतो.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana: पीएम किसानचे ₹२००० आले नाहीत? अशा पद्धतीने करा तक्रार; लगेच खात्यात जमा होतील पैसे

पीएम किसान मानधन योजना (PM Kisan Mandhan Yojana)

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेत लहान शेतकऱ्यांना पेन्शन दिली जाते. या योजनेत वयाची ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना दर महिन्याला ३००० रुपये मिळतात. म्हणजेच वर्षभरात ३६००० रुपये मिळतात. यामुळे वयोवृद्ध शेतकऱ्यांना मिळते.

जे शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेतात त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेत वर्षाला ६००० रुपये दिले जातात. ही मदत तर मिळतेच. परंतु त्यानंतर पीएम किसान योजनेत दर महिन्याला ३००० रुपये मिळणार आहेत.

या योजनेत १८ ते ४० वयोगटातील शेतकरी लाभ घेऊ शकतात. शेतकऱ्यांना त्यांच्यानुसार दर महिन्याला ५५ ते २०० रुपयांपर्यंत रक्कम भरायची आहे. ही रक्कम सरकार त्यांच्यासाठी गुंतवतात. यानंतर वयाची ६० वर्ष झाल्यानंतर शेतकऱ्यांना पैसे मिळतात.

६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर दर महिन्याला ३००० रुपये मिळणार आहे. यानंतर तुम्हाला कोणतेही पैसे जमा करण्याची गरज नाही. म्हणजेच पीएम किसानचे ६००० आणि पीएम किसान मानधन योजनेचे वर्षभरात ३६००० रुपये मिळणार आहेत.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana: पीएम किसानचा हप्ता जमा, कोल्हापूरातील ११ हजार शेतकऱ्यांना ₹२००० मिळालेच नाही; हे काम लगेच करा

अर्ज कसा करावा? (PM Kisan Mandhan Yojana Appliaction Process)

या योजनेसाठी तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. जवळच्या सीएससी केंद्रात जाऊन अर्ज करायचा आहे. यानंतर शेतकऱ्यांना पेन्शन कार्डदेखील दिले जाते.त्यावरुन त्यांना लाभ मिळणार आहे.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana: शेतकऱ्यांनो हे काम लगेच करा, अन्यथा मिळणार नाही ₹२०००; पीएम किसान योजनेबाबत मोठी अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com