PM Internship Scheme: केंद्र सरकारची खास योजना! या तरूणांना ₹९००० देणार, अट फक्त एकच, वाचा

PM Internship Scheme: केंद्र सरकारने तरुणांसाठी खास योजना सुरु केली आहे. या योजनेत तरुणांना काम करण्याची संधी मिळणार आहे. पीएम इंटर्नशिप योजनेत तुम्हाला चांगल्या कंपनीत काम करता येणार आहे. याचसोबत विद्यावेतनदेखील मिळणार आहे.
PM Internship Scheme
PM Internship SchemeSaam Tv
Published On
Summary

केंद्र सरकारची पीएम इंटर्नशिप योजना

तरुणांनी मिळणार चांगल्या कंपनीत काम करण्याची संधी

दर महिन्याला मिळणार ९००० रुपये

केंद्र सरकारने तरुणांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारने तरुणांसाठी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना सुरु केली आहे. या योजनेत देशांतर्गत विविध नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त तरुणांनी लाभ घ्यावा, यासाठी आवाहन करण्यात येत आहे.

PM Internship Scheme
Post Office Scheme: ५ लाखांचे होणार १० लाख; पोस्टाच्या या योजनेत फक्त ११५ महिन्यात पैसे होणार डबल

या योजनेअंतर्गत इंटर्नशिपचा कालावधी ६ किंवा ९ महिन्यांचा असणार आहे. या इंटर्नशिपसाठी तरुणांना स्टायपेंड दिली जाणार आहे. दर महिन्याला ९ हजार रुपयांचे विद्यावेतन दिले जाणार आहे. इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.

पीएम इंटर्नशिप योजनेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २५ वयोगटातील असावे. उमेदवार हा भारताचा नागरिक असावा. दहावी, बारावी उत्तीर्ण, आयटीआय, डिप्लोमा किंवा बीए.बीएस्सी, बीकॉम, बीसीए, बीबीए, बीफार्मा या विषयात पदवी प्राप्त उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. नोकरी किंवा नियमित शिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. मात्र, ऑनलाइन किंवा दूरस्थ शिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करु शकतात.

PM Internship Scheme
PPF Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! फक्त व्याजातून मिळणार ₹१८ लाख; वाचा कॅल्क्युलेशन

या कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी

पीएम इंटर्नशिप योजनेत तुम्हाला चांगल्या कंपनीत काम करण्याची संधी मिळणार आहे. MAHINDRA AND MAHINDRA LIMITED, BAJAJ AUTO LIMITED, RELIANCE INDUSTRIES LIMITED, BAJAJ ALLIANZ LIFE INSURANCE COMPANY, BERGER PAINTS INDIA LIMITED, EMCURE PHARMACEUTICALS LIMITED, HONDA MOTORCYCLE AND SCOOTER INDIA PVT. LTD., BVG INDIA LIMITED, COGNIZANT, IBM INDIA PRIVATE LIMITED अशा नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी उपलब्ध आहे.

या इंटर्नशिपसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. https://pminternship.mca.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करुन फॉर्म भरु शकतात.

PM Internship Scheme
Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त व्याजातून मिळणार ४.५० लाख रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com