PPF Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! फक्त व्याजातून मिळणार ₹१८ लाख; वाचा कॅल्क्युलेशन

Post Office PPF Scheme: पोस्ट ऑफिसच्या पीपीएफ योजनेत तुम्हाला भरघोस व्याजदर मिळते. या योजनेत तुम्ही फक्त व्याजातून १८ लाख रुपये मिळवू शकतात. या योजनेतील गुंतवणूक खूप फायदेशीर आहे.
PPF Investment
PPF InvestmentSaam Tv
Published On
Summary

पोस्टाची पब्लिक प्रोव्हिडंट स्कीम

फक्त व्याजातून मिळणार १८ लाख रुपये

गुंतवणूकीवर मिळते भरघोस व्याजदर

भविष्यात कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये, यासाठी आतापासून पैशांची बचत करणे गरजेचे आहे. तुम्ही जर आतापासूनच महिन्याच्या पगारातील काही रक्कम गुंतवली तर तुमच्याकडे चांगले पैसे जमा होतील. या पैशांचा वापर तुम्ही भविष्यात करु शकतात. अशीच एक योजना म्हणजे पब्लिक प्रोव्हिडंट फंड. या योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्ही व्याजातून लाखो रुपये कमवू शकतात.

PPF Investment
Government Scheme: सरकारची खास योजना! कर्मचाऱ्यांना दिले जातात ₹१५०००; तुम्हाला मिळणार का? वाचा पात्रता

पोस्ट ऑफिसच्या पीपीएफ योजनेत चांगले व्याजदर मिळते. याचसोबत गुंतवणूकीवर टॅक्स बेनिफिटदेखील मिळते. पीपीएफ योजनेत तुम्ही फक्त व्याजातून १८ लाखांपेक्षा जास्त कमाई करु शकतात.

पब्लिक प्रोव्हिडंट फंड योजनेत तुम्हाला ७.१ टक्के व्याजदर मिळते. यावर कोणताही टॅक्स लागत नाही. याचसोबत मॅच्युरिटीनंतर मिळणार रक्कमदेखील टॅक्स फ्री असते.ही योजना खूप लोकप्रिय आहे. पीपीएफ योजनेचा मॅच्युरिटी कालावधी १५ वर्षांचा आहे. तुम्ही जर सलग १५ वर्ष गुंतवणूक केली तर चांगला फंड जमा होणार आहे. याचसोबत तुम्ही अजून ५ वर्षांसाठी गुंतवणूक करु शकतात.

PPF Investment
PM Kisan Scheme: शेतकऱ्यांना मिळणार ९ हजार रुपये; PM किसानचा हप्ता वाढणार,पंतप्रधान मोदींची घोषणा

पीपीएफ योजनेत तुम्ही ५०० रुपयांपासून गुंतवणूक करु शकतात. तुम्ही एका वर्षात जास्तीत जास्त १.५० लाख रुपये गुंतवू शकतात. या योजनेत कोणीही गुंतवणूक करु शकते. या योजनेत सर्वात जास्त टॅक्स सूट मिळते. कलम ८०सीअंतर्गत १.५ लाखांवर टॅक्स बेनिफिट मिळतो.

फक्त व्याजातून मिळणार १८ लाख (PPF Scheme Earns 18 Lakh From Interest)

पीपीएफ योजनेत फक्त व्याजातून तुम्ही १८ लाख रुपये मिळू शकतात. या योजनेत तुम्ही दरवर्षी १.५ लाख रुपये १५ वर्षासाठी गुंतवले तर तुम्ही २२,५०,००० रुपये गुंतवणार आहात. यावर ७.१ टक्के व्याजदर मिळते. त्यामुळे तुमचे पैसे एकूण ४०,६८,२०९ रुपये मिळणार आहे. तुम्हाला फक्त व्याजातून १८,१८,२०९ रुपये मिळणार आहेत.

PPF Investment
PM Kisan Scheme: शेतकऱ्यांना मिळणार ९ हजार रुपये; PM किसानचा हप्ता वाढणार,पंतप्रधान मोदींची घोषणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com