Post Office Scheme: ५ लाखांचे होणार १० लाख; पोस्टाच्या या योजनेत फक्त ११५ महिन्यात पैसे होणार डबल

Post Office Kisan Vikas Patra Scheme: पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र योजना खूप लोकप्रिय आहे. या योजनेत ११५ महिन्यात पैसे डबल होणार आहेत.
Post Office Kisan Vikas Patra Scheme
Post Office SchemeSaam Tv
Published On
Summary

पोस्टाची किसान विकास पत्र योजना

पोस्टाच्या योजनेत पैसे होणार डबल

फक्त ११५ महिन्यात ५ लाखांचे होणार १० लाख

Post Office Kisan Vikas Patra: प्रत्येकाला आपल्या भविष्याची काळजी असते. भविष्यासाठी आतापासून पैशांची बचत करायला हवी. तुम्ही जर दर महिन्याला थोडे पैसे बाजूला काढले तर तुमच्याकडे काही वर्षांनी चांगला फंड तयार होईल. पोस्टाच्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगलाच परतावा मिळणार आहे. पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र योजना सुरु आहे.

Post Office Kisan Vikas Patra Scheme
PM Internship Scheme: खुशखबर! तरुणांना चांगल्या कंपनीत इंटर्नशिपची संधी; स्टायपेंडदेखील मिळणार; पीएम इंटर्नशिप योजना आहे तरी काय?

किसान विकात्र पत्र योजनेत तुमचे पैसे डबल होणार आहेत. फक्त ११५ महिन्यात तुम्हाला पैसे मिळणार आहे. या पैशांवर सरकार स्वतः गॅरंटी देते. पोस्ट ऑफिसच्या योजनेतील गुंतवणूक ही सुरक्षित असते. स्वतः सरकार या योजनेवर गॅरंटी देते.

किसान विकास पत्र योजनेत तुम्हाला चांगले रिटर्न मिळतात. या योजनेत ९ वर्ष ७ महिने म्हणजे ११५ महिन्यात पैसे डबल होणार आहेत.

किसान विकास पत्र योजनेत तुम्हाला जबरदस्त व्याज मिळते. सध्या या योजनेत ७.५० टक्के व्याज मिळत आहे. या योजनेत वार्षिक आधारावर व्याज दिले जाते. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी ११५ महिन्यांचा आहे. तुम्हाला त्या कालावधीसाठी गुंतवणूक करायची आहे.

पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र योजनेत तुम्हाला भरघोस परतावा मिळतो. या सरकारी योजनेत तुम्ही फक्त १००० रुपयांपासून गुंतवणूक करु शकतात. जास्तीत जास्त कितीही रक्कम गुंतवू शकतात.१० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील नागरिक या योजनेत गुंतवणूक करु शकतात.

Post Office Kisan Vikas Patra Scheme
Government Scheme: सरकारची खास योजना! कर्मचाऱ्यांना दिले जातात ₹१५०००; तुम्हाला मिळणार का? वाचा पात्रता

कॅल्क्युलेशन (Kisan Vikas Patra Scheme Calculation)

पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र योजनेत ५ लाख रुपये एकत्र गुंतवायचे आहेत. यामध्ये ७.५ टक्के व्याज मिळणार आहे. पहिल्या वर्षी तुम्हाला व्याजात ३७,५०० रुपये मिळणार आहे.त्यामुळे तुम्हाला ५ लाख ३७ हजार रुपये मिळणार आहे. दुसऱ्या वर्षीच्या व्याजातून ४०,३१२ रुपये मिळणार आहे. त्यावेळी ५,७७,८१२ रुपये मिळणार आहेत. यानंतर ११५ महिन्यांना एकूण १० लाख रुपये मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला डबल पैसे मिळणार आहे. ६ लाख रुपये गंतवले तर १२ लाख आणि ७ लाख गुंतवले तर १४ लाख रुपये मिळणार आहेत.

Post Office Kisan Vikas Patra Scheme
Post Office Scheme : ₹१००० गुंतवा अन् महिन्याला मिळवा २०, हजार व्याज; पोस्टाच्या या योजनेत व्हाल मालामाल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com