

सध्या अनेकांना त्यांची स्वप्न पुर्ण करण्यासाठी गुंतवणुक करणं खूप महत्वाचं वाटतं. त्यामुळे लोक फिक्स्ड डिपॉजिटचा पर्याय निवडतात. मात्र FDमध्ये मार्च महिन्यात अनेक बदल झालेले पाहायला मिळाले आहेत. यामध्ये देशातल्या काही प्रमुख बँकांनी त्यांच्या एफडीच्या व्याजदरांमध्ये बदल केला आहे. या बदलांनंतर काही बँका सीनियर सिटीजनना 8 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा देत आहेत. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही माहिती महत्त्वाची ठरू शकते.
नवीन बदल करणाऱ्या बँकांमध्ये HDFC Bank, Yes Bank,BandhanBank आणि Suryoday Small Finance Bank यांचा समावेश आहे. या बँकांनी 3 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या फिक्स्ड डिपॉजिटवरचे व्याजदर अपडेट केले आहेत.
HDFC बॅंकेने 3 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीवरील व्याजदरांमध्ये बदल केला आहे. बँकेच्या अधिकृत माहितीनुसार नवीन दर 6 मार्च 2026 पासून लागू झाले आहेत. या बदलानंतर सामान्य ग्राहकांना 2.75 टक्के ते 6.50 टक्क्यांपर्यंत व्याज मिळणार आहे. तर सीनियर सिटीजनसाठी व्याजदर 3.25 टक्के ते 7 टक्के दरम्यान ठेवण्यात आले आहेत.
Yes Bank ने सुद्धा एफडीच्या व्याजदरांमध्ये सुधारणा केली. बँकेचे नवीन दर 5 मार्च 2026 पासून लागू झाले आहेत. या बदलानंतर सामान्य ग्राहकांना 3.25 टक्के ते 7 टक्क्यांपर्यंत व्याज मिळणार आहे. तर सीनियर सिटीजनना 3.75 टक्के ते 7.75 टक्क्यांपर्यंत परतावा मिळण्याची शक्यता आहे. बँकेच्या माहितीनुसार 36 महिने ते 60 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर जास्त व्याज दिलं जाणार आहे.
Bandhan Bank ने सुद्धा 3 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीवरील व्याजदर बदलले आहेत. बँकेचे नवीन दर 5 मार्च 2026 पासून लागू झाले आहेत. या बदलानंतर सामान्य ग्राहकांना 2.95 टक्के ते 7.25 टक्के व्याज मिळणार आहे. तर सीनियर सिटीजनना 3.70 टक्के ते 7.75 टक्क्यांपर्यंत व्याजदराचा लाभ मिळणार आहे. अलीकडच्या काळात एफडीच्या व्याजदरांमध्ये होत असलेल्या बदलांमुळे गुंतवणूकदारांनी एफडी करण्यापूर्वी वेगवेगळ्या बँकांच्या दरांची तुलना करणे गरजेचं झालं आहे. योग्य कालावधी आणि जास्त परतावा देणारी योजना निवडल्याने सुरक्षित गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळू शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.