Kisan Vikas Patra: ११५ महिन्यात पैसे होणार डबल; किसान विकास पत्र योजनेत मिळतो सर्वाधिक परतावा

Kisan Vikas Patra Yojana: केंद्र सरकारने नागरिकांसाठी खास किसान विकास पत्र योजना सुरु केली आहे. या योजनेत तुमचे पैसे डबल होतात. तुम्ही जी रक्कम गुंतवाल त्याच्या दुप्पट रक्कम तुम्हाला मिळणार आहे.
Kisan Vikas Patra
Investment In Kisan Vikas Patrasaam tv
Published On

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. प्रत्येकजण आपल्या भविष्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात जेणेकरुन भविष्यात कोणतीही अडचणी येणार नाही. दरम्यान, जर तुम्ही कोणत्या योजनेत गुंतवणूक करायचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. केंद्र सरकारच्या किसान विकास पत्र योजनेत तुम्हाला चांगला परतावा मिळतो.

Kisan Vikas Patra
Post Office Schemes : दररोज ४०० रुपये गुंतवा अन् ७० लाख मिळवा, पोस्टाच्या या योजनेत मिळेल जबरदस्त परतावा

पोस्ट ऑफिसद्वारे किसान विकास पत्र योजना राबवली जाते. या योजनेत तुम्हाला फक्त ११५ महिन्यात डबल परतावा मिळणार आहे. ११५ महिने म्हणजे ९ वर्ष ७ महिन्यात तुम्हाला जबरदस्त परतावा मिळणार आहे. या योजनेत जर तुम्ही ८००० रुपये गुंतवले तर तुम्हाला १६००० रुपये मिळणार आहे.

किसान विकास पत्र योजना काय आहे?

किसान विकास पत्र योजना सेमी अर्बन आणि ग्रामीण क्षेत्रात सुरु आहे. या योजनेत तुम्हाला जास्त दिवसांसाठी गुंतवणूक करायची आहे.

किसान विकास पत्र योजनेत तुम्ही कमीत तमी १००० रुपयांची गुंतवणूक करु शकतात. जास्तीत जास्त कितीही रक्कम तुम्ही गुंतवू शकतात. या योजनेत तुम्हाला ७.५ टक्के चक्रव्याढ व्याज मिळणार आहे. या योजनेतील गुंतवणूकीवर तुम्हाला जबरदस्त व्याज मिळणार आहे.

दर तुम्ही दरवर्षी गुंतवणूक केली तर तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे. यामध्ये मूळ रक्कमेचे व्याज आणि त्यावरील व्याजदेखील जोडले जाते.त्यामुळे डबल फायदा होतो. या योजनेतील व्याजदर दर तीन महिन्यांनी बदलले जाते. त्यामुळे हे व्याजदर वाढू किंवा कमी होऊ शकते.

Kisan Vikas Patra
Agriculture Scheme: जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी सरकार करेल मदत; कसा कराल अर्ज, काय आहे पात्रता?

किसान विकास पत्र योजनेचा लाभ कसा घ्यावा? (Kisan Vikas Patra Yojana Application Process)

या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर जवळील पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जायचे आहे.

यानंतर फॉर्म A भरा.

यानंतर तुमचे नाव, पत्ता आणि इतर माहिती भरा.

यानंतर गुतवणूकीची रक्कम, नॉमिनी याबाबत माहिती भरा.

यानंतर केवायसी करा.

पैसे रोख रक्कम द्या. तुम्ही ५०,००० रुपयांपर्यंतचे पैसे रोख देऊ शकतात.

यावरची रक्कम असेल तर डिमांड ड्राफ्ट किंवा चेकद्वारे द्या.

यानंतर बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये पडताळणी केली जाईल.

यानंतर तुम्हाला किसान विकास प्रमाणपत्र मिळेल. हे प्रमाणपत्र नीट जपून ठेवा.

Kisan Vikas Patra
Scheme For Youth: पहिली नोकरी मिळताच सरकार देणार ₹१५०००, तरुणांसाठी १ लाख कोटींची योजना; PM मोदींची घोषणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com