

ईपीएफओने सप्टेंबर महिन्याच्या पीएफ रिटर्नची मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली
सप्टेंबर २०२६ चा पीएफ रिटर्न भरण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर होती
पीएफ रिटर्न भरण्याची मुदत वाढवल्याने कर्मचाऱ्यांना दिलासा
वेतन मर्यादा १५ हजारांवरून २५ हजार झाल्याचा पीएफवर परिणाम
कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. एपीएफओने महत्वाचा निर्णय घेतला आहे. पीएफ रिटर्न भरण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. पीएफची रक्कम ही प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पगारातून दर महिन्याला कापली जाते. निवृत्तीनंतर आर्थिक आधार मिळवून देण्यात पीएफची मोठी भूमिका असते.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ईपीएफओने सप्टेंबर महिन्याच्या पीएफ रिटर्न भरण्याच्या अंतिम मुदतीत वाढ केली. आता ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पीएफ रिटर्न दाखल करता येणार आहे. याआधी १५ ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत वाढली आहे. त्यामुळे कंपन्यांना आवश्यक तपशील सादर करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळाला आहे. पण ही मुदत नेमकी का वाढवण्यात आली? हे आपण जाणून घेणार आहोत...
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF), कर्मचारी पेन्शन योजना (EPS) आणि कर्मचारी ठेव-संलग्न विमा योजना (EDLI) यांसारख्या योजनांअंतर्गत कंपन्यांना दर महिन्याला कर्मचाऱ्यांच्या पगाराचा तपशील आणि पीएफमध्ये जमा होणाऱ्या योगदानाची माहिती सादर करावी लागते. या प्रक्रियेला इलेक्ट्रॉनिक चलन-सह-रिटर्न (ECR) असे म्हटले जाते. या माध्यमातून नियोक्ते कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा आणि संबंधित योजनांमधील योगदानाचा तपशील दाखल करतात. पीएफ रिटर्न भरण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आल्यामुळे सप्टेंबर महिन्याचा रिटर्न दाखल करण्यासाठी १५ दिवसांचा अधिक वेळ मिळाला आहे.
सप्टेंबर महिन्याचा पीएफ रिटर्न दाखल करण्याची अंतिम तारीख १५ ऑक्टोबर होती. पण ही मुदत वाढवून आता ३१ ऑक्टोबर २०२६ करण्यात आली आहे. त्यामुळे नियोक्त्यांना कर्मचाऱ्यांच्या वेतनाची आणि पीएफ योगदानाची माहिती तपासून रिटर्न दाखल करता येणार आहे. पीएफ रिटर्न भरण्याची अंतिम मुदत वाढवण्यामागचे कारण म्हणजे, वेतन मर्यादेतील बदल हे आहे. १७ सप्टेंबर रोजी वेतन मर्यादेत वाढ करण्यात आली. ही मर्यादा १५०० रुपयांवरून २५००० रुपये करण्यात आली. त्यामुळे सप्टेंबर महिन्यातील पीएफची गणना करताना नियोक्त्यांना वेगवेगळ्या कालावधींचा विचार करावा लागू शकतो.
महिन्याच्या मध्यात वेतन मर्यादेत बदल झाल्यामुळे सप्टेंबर महिन्यासाठी जुन्या आणि नव्या मर्यादेनुसार वेतन आणि पीएफ या दोन्हींच्या योगदानाचा तपशील तपासणे आवश्यक असणार आहे . ही प्रक्रिया योग्य पद्धतीने पूर्ण करता यावी यासाठी नियोक्त्यांना रिटर्न दाखल करण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, पीएफ रिटर्न दाखल करत असताना नियोक्त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा आणि पीएफ योगदानाचा तपशील अचूक असल्याची खात्री करून घ्यावी. सप्टेंबर महिन्यात लागू असलेल्या वेतन मर्यादेशी संबंधित नोंदी तपासाव्यात. रिटर्न दाखल करण्यापूर्वी वेतन नोंदी आणि पीएफ योगदानाची आकडेवारी जुळवून घ्यावी. रिटर्नमध्ये काही त्रुटी आढळल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी. त्यासोबतच, अंतिम दिवसाची वाट न पाहता शक्य तितक्या लवकर रिटर्न दाखल करणे गरजेचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.