EPFO Pension : रिटायरमेंटनंतर मिळू शकतात दरमहा 12,500? EPS पेन्शनचे गणित आत्ताच घ्या समजून

Pension Rules: तुम्ही पीएफ जमा करत असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुम्हाला भविष्यात मोठ्या रकमेची पेन्शन मिळवायची असेल तर काही पेन्शनचे गणित समजून घेणे महत्त्वाचे आहे.
EPFO Pension
EPFO Pensionsaam tv
Published On: 

EPFO Pension Rules: तुम्ही नोकरी करत असाल आणि पीएफमध्ये पैसे जमा करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने EPFO अंतर्गत अनिवार्य कव्हरेजसाठी वेतन मर्यादा १५०० रुपयांवरून २५,००० प्रतिमहिना केली आहे. या निर्णयामुळे ५१ लाखांहून जास्त अतिरिक्त कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा योजनांच्या कक्षेत येण्याची संधी मिळणार आहे. मात्र, या बदलामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याला रिटायरमेंटनंतर १२,५०० मासिक पेन्शन मिळेल, असा अर्थ होत नाही.

वेतन मर्यादा २५,००० केल्याने कर्मचाऱ्यांना काय फायदा मिळेल?

केंद्र सरकारच्या अधिकृत माहितीनुसार, नवीन वेतन मर्यादा १७ सप्टेंबर २०२६ पासून लागू करण्यात आली आहे. यामुळे याआधी १५,००० रुपयांपेक्षा जास्त वेतनामुळे अनिवार्य EPFO कव्हरेजबाहेर असलेल्या पात्र कर्मचाऱ्यांनाही आता EPF, EPS आणि EDLI यांसारख्या सामाजिक सुरक्षा योजनांचा फायदा होईल. मात्र, त्यासाठी संबंधित नियम आणि पात्रतेच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.

EPFO Pension
Maharashtra Farmers Scheme : दसऱ्याच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार १ लाख रुपये? जाणून घ्या सत्य

१२,५०० रुपये पेन्शन नेमकी कशी मिळू शकते?

EPS अंतर्गत पेन्शनचं गणित पेन्शनपात्र वेतन आणि पात्र सेवा कालावधीच्या आधारे केली जाते. सूत्रानुसार, पेन्शनपात्र वेतनाला पात्र सेवा वर्षांनी गुणून ७० ने भागलं जातं. उदाहरणार्थ २५,००० पेन्शनपात्र वेतन आणि ३५ वर्षांची पात्र सेवा गृहीत धरल्याने गणितानुसार १२,५०० मासिक पेन्शन होते. मात्र, हा फक्त उदाहरणार्थ हिशोब असून प्रत्यक्ष पेन्शन लागू नियमांवर अवलंबून असते.

EPFO Pension
Chanakya Niti : कोणाला जवळ करावं, कोणाची साथ सोडावी? चाणक्यांनी सांगितले 8 महत्त्वाचे धडे, जे आयुष्यभर लक्षात ठेवा

EPF आणि EPS मधील योगदान किती?

नियमांनुसार, १२ टक्के योगदानापैकी लागू अटींनुसार ८.३३ टक्के रक्कम EPS मध्ये आणि उर्वरित ३.६७ टक्के EPF मध्ये जमा होते. २५,००० पेन्शनपात्र वेतन गृहीत धरल्याने EPS मधील योगदान २,०८२.५० होतं.

EPS कपातीबाबत तक्रार कुठे करावी?

पगार आणि EPS योगदानात तफावत असेल तर कर्मचाऱ्यांनी सर्वात आधी आपल्या कंपनीच्या HR विभागाशी संपर्क साधावा. प्रश्न सुटला नाही, तर EPFO च्या अधिकृत EPFiGMS तक्रार पोर्टलवर तक्रार दाखल करता येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com