

Petrol Diesel Price Today 14th August 2023: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने चढ उतार पहायला मिळतात. डब्लूटीआय क्रूड ०.२५ डॉलरने घसरले असून प्रती बॅरल ८२.९४ वर पोहचले आहे. ब्रेंट क्रूड ०.३० डॉलरने कमी झालं असून ८६.५१ डॉलरने विकलं जात आहे. दररोज सकाळी ६ वाजता सरकारी तेल कंपन्या कच्च्या तेलाच्या किंमती जाहीर करतात. (Latest Marathi News)
आज सरकारी कंपन्यांनी जाहीर केलेल्या दरांनुसार, काही ठिकणी पेट्रोल-डिझेलचे दर घसरलेत. तर काही ठिकाणी या दरांनी उच्चांकी गाठली आहे. महाराष्ट्रा आणि मध्य प्रदेशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती आज घसरल्या आहेत. महाराष्ट्रात पेट्रोल ४० आणि डिझेल ३९ पैशांनी घसरलं आहे. तसेच मध्य प्रदेशमध्ये पेट्रोल २५ आणि डिझेल २२ पैशांनी स्वस्त झालंय.
झारखंडमध्ये पेट्रोलच्या किंमती वाढल्यात. पेट्रोल २६ पैशांनी आणि डिझेल देखील २६ पैशांनी महागलं आहे. गुजरातमध्ये पेट्रोल २७ पैशांनी महागलं आहे. डिझेल २७ पैशांनी महागलं आहे. राजस्थानमध्ये पेट्रोल १२ पैशांनी आणि डिझेल ११ पैशांनी महागलं आहे.
चारही महानगरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर
दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटरवर पोहचलं आहे.
मुंबईमध्ये पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटरने विकलं जात आहे.
कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटरने विकलं जातंय.
चेन्नईमध्ये पेट्रोल १४२ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९४.३३ रुपये प्रति लिटर आहे.
तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर असे तपासा?
शहर आणि राज्यानुसार पेट्रोल-डिझेलच्या किमती निश्चित केल्या जातात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमच्या शहराची नवीनतम किंमत जाणून घ्यायची असेल, तर तुम्ही एसएमएसद्वारेच तपासू शकता. जर तुम्ही इंडियन ऑइलचे ग्राहक असाल तर इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी RSP<deलर कोड> लिहा आणि ९२२४९९२२४९ वर मेसेज पाठवा.
तर, BPCL ग्राहकांना डीलर कोड> 9223112222 नंबरवर पाठवावा लागेल आणि HPCL ग्राहकांना HPPRICE <डीलर कोड> 9222201122 क्रमांकावर पाठवावा लागेल. यानंतर, काही मिनिटांत कंपनी तुम्हाला शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर पाठवेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.