Buldhana Crime: एकटी असल्याचे पाहून घरात शिरला... जीवे मारण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार; परिसरात खळबळ

Jamod News: या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Buldhana Crime News
Buldhana Crime NewsSaam tv
Published On

संजय जाधव, प्रतिनिधी...

Buldhana News: बुलढाण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बुलढाण्याच्या जळगाव जामोद परिसरात घरात झोपलेल्या तरुणीवर तरुणाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहेत. (Crime News In Marathi)

Buldhana Crime News
Village Against Love Marriage: गावकऱ्यांचा प्रेमविवाहाला विरोध; ग्रामपंचायतीत ठराव करत सरकारकडे केली मोठी मागणी, नेमकं काय आहे प्रकरण?

याबाबत जळगाव (Jalgaon) जामोद परिसरातील काळेगाव येथे राहणाऱ्या मुलीने तक्रार दाखल केली आहे. मुलीच्या तक्रारीनुसार, मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा येथील २४ वर्षीय अनिकेत संजय जाधव यांच्यासोबत दोन वर्षांपूर्वी प्रेम संबंध होते.

मात्र गेल्या वर्षी त्यांच्यात वाद झाल्याने दोघेही वेगळे राहत होते. पिडित तरुणी आपल्या घरात एकटी झोपलेली असताना आरोपी तरुणाने तिच्या घरात शिरून तिला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

Buldhana Crime News
Ahmednagar News Today: नगर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार; प्रस्थापित पक्षांची डोकेदुखी वाढणार, 35 हून अधिक सरपंच BRS च्या वाटेवर

दरम्यान, या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात (Jamod Police Station) भारतीय दंड विधान कलम ३७६, ४५२, ५०६ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com