Village Against Love Marriage: गावकऱ्यांचा प्रेमविवाहाला विरोध; ग्रामपंचायतीत ठराव करत सरकारकडे केली मोठी मागणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Village Against Love Marriage: नागरिकांचा प्रेमविवाहास विरोध असल्याचे समोर आले आहे. नाशिकमधील सायखेडा ग्रामपंचायतीने प्रेमविवाहाला विरोध करत ठराव मंजूर केला आहे.
Love Marriage
Love Marriage Saam TV
Published On

Nashik News: गेल्या काही वर्षात प्रेम विवाह करणाऱ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे . आई-वडिलांच्या धाकामुळे अरेंज मॅरेज करणे आता कमी झाले आहे. अनेक तरुण-तरुणी त्यांच्या पसंतीनुसार जोडीदार निवडत आहे.

मात्र, आजही काही नागरिकांचा प्रेमविवाहास विरोध असल्याचे समोर आले आहे. नाशिकमधील सायखेडा ग्रामपंचायतीने प्रेमविवाहाला विरोध करत ठराव मंजूर केला आहे. (Latest Marathi News)

नाशिक जिल्ह्यातील सायखेडा ग्रामपंचायतने आई-वडिलांच्या परवानगीशिवाय प्रेमविवाहाला कोर्टाने मान्यता देऊ नये, यासाठी ठराव केला आहे. असं ठराव करणारा सायखेडा ग्रामपंचायत बहुदा राज्यातील पहिला ग्रामपंचायत ठरलं आहे. ग्रामपंचायत केलेला हा ठराव राज्य सरकारकडे पाठवणार आहे.

Love Marriage
NashiK Farmers News: शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा होणार का? उप-निबंधक कार्यालयाने दिली महत्वाची माहिती

सायखेडा ग्रामपंचायत हे आई-वडिलांच्या परवानगीशिवाय प्रेमविवाहाला कोर्टाने मान्यता देऊ नये यासंदर्भात कायदा करावा यासाठी सरकारकडे मागणी करणार आहे.

आई-वडिलांच्या परवानगीशिवाय प्रेमविवाह केल्याने अनेक अडचणी निर्माण होतात, असा दावा गावातील गावकऱ्यांचा आहे. गावातील वाढत्या प्रेमविवाहाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

लव्ह जिहाद विरोधी भाजप आक्रमक

दरम्यान, सकल हिंदू समाजाच्या वतीने काही दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात केले होते. धर्मांतरण आणि लव्ह जिहाद विरोधी कायदा करावा अशी मागणी करत हजारो हिंदू बांधव आणि महिला या मोर्चात सहभागी झाले होते. भाजप आमदार नितेश राणे, खा. सुजय विखे हे देखील मोर्चाला उपस्थित होते.

राहुरी शहरातून निघालेल्या मोर्चाचे रूपांतर विराट सभेमध्ये झाले होते. यावेळी नितेश राणे यांनी लवकरच लव्ह जिहाद कायदा येणार असल्याचे सांगितले. राज्यात लवकरच धर्मांतरण विरोधात कायदा आणण्याची आमची तयारी आहे. त्याचं 90 % काम पूर्ण झालं असून कोणत्याही क्षणी तो कायदा येऊ शकतो, असे राणे म्हणाले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com