NashiK Farmers News: शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा होणार का? उप-निबंधक कार्यालयाने दिली महत्वाची माहिती

NashiK Farmers News: अनुदानास पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच सरकारकडून अनुदानाची रक्कम जमा होणार आहे.
NashiK Farmers News
NashiK Farmers NewsSaam tv
Published On

Nashik News: नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आता एक दिलासादायक बातमी आहे. अनुदानास पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच सरकारकडून अनुदानाची रक्कम जमा होणार आहे. याबद्दल जिल्हा उप निबंधक कार्यालयाने ही माहिती दिली आहे. (Latest Marathi News)

यंदा लेट खरीप कांद्याला उत्पादन खर्चाच्या खाली भाव मिळाल्याने कांदा उत्पादक पट्ट्यात संतापाची लाट पसरली होती. त्यामुळे राज्य सरकारने १ फेब्रुवारी ते ३१ मार्च या कालावधीत विक्री झालेल्या कांद्याला क्विंटलला ३५० रुपये अनुदानाची घोषणा केली होती.

NashiK Farmers News
#Shorts : Nashik News | नाशिक शहरातील सिटी लिंक बससेवा ठप्प ! पगार थकल्याने कर्मचारी संपावर!

त्यानंतर जिल्ह्यात ३० एप्रिल अखेर कांदा अनुदानासाठी एक लाख ९३ हजार ५२४ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १ लाख ५२ हजार ७८५ पात्र अर्ज अनुदानासाठी पात्र ठरले होते.

या पात्र शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ देण्यासाठी तब्बल ४३५ कोटींची तरतूद करण्यात आली असून येत्या १५ ऑगस्टपर्यंत हे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर जमा होणार आहे, अशी माहिती जिल्हा उप निबंधक कार्यालयाने दिली आहे.

अनुदानासाठी एक लाख ९३ हजार ५२४ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १ लाख ५२ हजार ७८५ पात्र अर्ज अनुदानासाठी पात्र ठरले होते. तर ४० हजार ७३९ शेतकऱ्यांचे अर्ज अपात्र ठरले.

NashiK Farmers News
Nashik Eknath Khadse | Narendra Modi यांचा दावा खोटा? शिवसेना-भाजपची युती म्हणून तुटली..

अनुदानापासून वंचितची कारणे काय आहेत?

कांदा अनुदानासाठी सुरुवातीला सात-बारा उताऱ्यावरील कांद्याच्या क्षेत्राचा ई-पीकपेरा नोंद आवश्यक होती. मात्र, अनेक शेतकरी मुकणार म्हटल्यावर ही अट शिथिल करण्याची मागणी झाली.

त्यानंतर कांदा अनुदानासाठी गावस्तरावर सात-बारा उताऱ्यावर क्षेत्राची नोंद करण्याचा निर्णय पणन विभागाने घेतला. मात्र, त्यापूर्वी संगणकीकृत नसलेल्या नोंदी ग्राह्य धरल्या गेल्या नाहीत. त्यामुळे अनेक अर्ज अपात्र ठरल्याची माहिती उपलब्ध होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com