Pan Card : पॅनकार्ड धारकांनो सावधान! तुमच्या एका चुकीने बसेल १०,००० रुपयांचा दंड

Understanding PAN card penalties : पॅनकार्ड धारकांसाठी महत्वाची माहिती हाती आलीये. तुमचं पॅनकार्ड निष्क्रिय असेल तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.
PAN card penalties
Pan Card Saaam tv
Published On

पॅनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. आयकर विभागाने काही पॅनकार्ड धारकांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पॅनकार्डधारक अॅक्टिव्ह नसलेलं कार्ड वापरत असेल, तर या व्यक्तीस १०००० रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. आयकर विभागाच्या या कारवाईमुळे पॅनकार्डधारकांची चिंता वाढली आहे.

PAN card penalties
Ahmedabad Plane Crash : अनेकांच्या स्वप्नांची राखरांगोळी, कित्येकांचे कुटुंब उद्ध्वस्त; एका विमान अपघाताने सारंच हिरावलं

पॅनकार्डचा उपयोग केवळ आयकर रिटर्न भरण्यासाठी केला जात नाही. तर बँकिंग, गुंतवणूक, प्रॉपर्टी खरेदी-विक्री, कर्ज काढणे आणि अन्य बाबींसाठी पॅनकार्डचा उपयोग केला जातो. तुमचं पॅनकार्ड इनअॅक्टिव्ह असेल. त्यानंतर व्यक्ती जाणूनबुजून किंवा अनावधानाने वापरात आणत असेल. तर आयकर विभाग कलम २७२ बी अंतर्गत १०००० रुपयांचा दंड आकारू शकते.

PAN card penalties
Husband Wife Quarrel : बायकोच्या साबणाने अंघोळ करणे भोवलं; तक्रारीनंतर पोलिसांनी ठोकल्या बेड्या, VIDEO

पॅनकार्ड हे आधारकार्डशी लिंक नसेल, तर पॅनकार्ड अॅक्टिव्ह राहत नाही. त्यामुळे पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करणे गरजेचे आहे. आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक न केल्यास ते अॅक्टिव्ह राहत नाही. त्यामुळे सरकारने सर्वांना याबाबत आदेश दिले आहेत.

पॅनकार्ड अॅक्टिव्ह असल्याचं कसं ओळखाल?

तुमचं पॅनकार्ड अॅक्टिव्ह आहे की नाही? ही बाब तुम्ही घरबसल्या जाणून घेऊ शकतात. यासाठी तुम्ही आयकर विभागाच्या ई-फायलिंग वेबसाइटवर जाऊन Verify Your PAN हा पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा संपूर्ण पॅन क्रमांक, पूर्ण नाव, जन्म तारीख आणि मोबाईल क्रमांक नमूद करा. त्यानंतर एक ओटीपी तुमच्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त होईल. त्यानंतर तुमचं पॅनकार्ड आधारकार्डाशी लिंक आहे का, याबाबत माहिती कळेल.

PAN card penalties
Mumbai Road Accident : मुंबईच्या गोवंडीत भीषण अपघात; डंपरच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू

तुमचं पॅनकार्ड अॅक्टिव्ह नसेल, तर तुम्ही तातडीने आधारकार्ड लिंक करून घ्या. तुम्ही पॅनकार्ड आधारकार्डाशी लिंक केलं असेल, तर एकदा पडताळणी करून घ्या. तुमच्याकडे दोन पॅनकार्ड असेल, तर एक आयकर विभागाकडे सोपवा. तुम्ही यासाठी NSDL किंवा UTIISL च्या वेबसाइटवर संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com