
मयूर राणे, साम टीव्ही
मुंबई : राज्यात अपघाताचं सत्र सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे. या भीषण अपघातात लोकांचा नाहक बळी जात आहेत. मुंबईतही शनिवारी दुपारी अपघाताची भीषण घडली. मुंबईच्या गोवंडीत भीषण अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर बघ्यांची एकच गर्दी झाली. तिघांच्या मृत्यूनंतर परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
मुंबईत अपघाताच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. शहरात वर्दळीच्या ठिकाणी अपघात होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कोस्टल रोडच्या बोगद्यात सकाळच्या सुमारास कार अपघाताची घटना घडली. त्यानंतर आता गोवंडीत भीषण अपघाताची घटना घडली आहे. गोवंडीतील वर्दळीचं ठिकाण असलेल्या शिवाजीनगर सिग्नलवर भीषण अपघात झाला.
गोवंडीतीत शिवाजीनगर सिग्नलवर डंपरने धडक दिल्याने तीन जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर शिवाजीनगरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. अपघातानंतर शेकडो लोक रस्त्यावर उतरले. या लोकांनी रस्ता अडवला. रस्ता अडवल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली.
मुंबईच्या गोवंडी शिवाजीनगर भागात एका डंपर चालकाने तीन जणांना चिरडल्याची घटना दुपारी घडली आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. गोवंडीतील घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर हा अपघात झाला. या अपघातानंतर संतप्त जमावाने या मार्गावर ठिय्या दिला आहे. संतप्त जमावामुळे या मार्गावर दोन्ही दिशेने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. या अपघातातील आरोपी डंपर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस पोहोचले आहेत.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मेंढवण खिंडीच्या उतारावरील धोकादायक वळणावर पुलावर कंटेनर उलटून अपघात झाला. या अपघातग्रस्त कंटेनरमधील रसायन महामार्गावर वाहत आहे. वाहनातून निघत असलेल्या धुरामुळे वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अपघातामुळे गुजरात मार्गीकेवर वाहतूक कोंडी झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.