बँकेकडून तुमच्या घराची मूळ कागदपत्रे हरवली? कोर्टाचा असा ऐतिहासिक निर्णय, जो प्रत्येकाने जाणून घेतलाच पाहिजे

Home Loan Documents : गृहकर्जाची मूळ मालमत्ता कागदपत्रे बँकेकडून हरवल्यास ग्राहकांना कोणते अधिकार आहेत? राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने (NCDRC) अ‍ॅक्सिस बँकेला १५.५ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.
Home Loan Documents
Home Loan Documentsसाम टीव्ही मराठी
Published On

What to do if bank loses original property documents : गृहकर्ज (Home Loan) घेताना आपल्या मालमत्तेची सर्व मूळ कागदपत्रे (Original Property Papers) बँक सुरक्षिततेसाठी जमा करतात. या कागदपत्रांची सुरक्षितता राखणे ही पूर्णपणे बँकेची जबाबदारी असते. पण बँकेने तुमच्या घराची ओरिजिनल कागदपत्रे गहाळ केली तर? काय करावं. दिल्लीतील एका दांपत्याबाबत असाच धक्कादायक प्रकार घडला आहे. होम लोनची सर्व कागदपत्रे हरवल्याबद्दल 'अ‍ॅक्सिस बँके'ला (Axis Bank) तब्बल १५.५ लाख रुपयांची भरपाई देण्याचे थेट आदेशच मंचाने दिले. money9live.com ने याबाबतचे वृत्त दिले आहे. तुमच्यासोबतही असा प्रकार घडल्यास भरपाई कशी मिळवायची? ग्राहकांचे नेमके अधिकार काय आहेत, हे जाणून घ्या...

नेमके काय घडले?

दिल्लीमधील एका दाम्पत्याने अ‍ॅक्सिस बँकेकडून होम लोन घेतले होते. कर्जाची संपूर्ण परतफेड झाल्यानंतर त्यांनी आपल्या घराची मूळ कागदपत्रे (Original Property Papers) परत मागितली. पण त्यावेळी बँकेने ती गहाळ झाल्याचे धक्कादायक उत्तर दिले. कागदपत्रांशिवाय मालमत्तेचे मूल्य प्रचंड घसरते आणि भविष्यात घर विकणे किंवा त्यावर पुन्हा कर्ज काढणे कठीण होते, हे लक्षात घेऊन या दांपत्याने थेट ग्राहक मंचात (Consumer Forum) धाव घेतली.

Home Loan Documents
Mumbai Pune Expressway Accident: मिसिंग लिंकच्या बोगद्यात मध्यरात्री भीषण अपघात, पुण्यातील युवा नेत्याचा जागीच मृत्यू

कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय:

राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने (NCDRC) या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. ग्राहक मंचाने बँकेचा निष्काळजीपणा स्पष्ट केला. या प्रकरणात ग्राहक आयोगाने दांपत्याच्या बाजूने निकाल दिला.

आयोगाने म्हटले की, फक्त 'डुप्लिकेट कागदपत्रे' काढून देणे पुरेशा भरपाईचे कारण असू शकत नाही, असे स्पष्ट करत मंचाने अ‍ॅक्सिस बँकेला ग्राहकाला झालेल्या मानसिक त्रासाबद्दल आणि मालमत्तेच्या संभाव्य नुकसानाबद्दल १५.५ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.

Home Loan Documents
मोठी बातमी! भाजपच्या बड्या नेत्याला मध्यरात्री अटक, महाराष्ट्रात राजकीय खळबळ

तुमच्यासोबतही असा प्रकार घडल्यास काय करावे?

  • बँकेकडे तत्काळ लेखी तक्रार नोंदवा आणि पोच पावती (Acknowledgement) सांभाळून ठेवा.

  • बँकेला एफआयआर (FIR) नोंदवण्यास आणि वर्तमानपत्रात जाहीर नोटीस देण्यास सांगा.

  • बँकेने योग्य प्रतिसाद न दिल्यास रिझर्व्ह बँकेच्या (RBI) लोकपालकडे (Ombudsman) किंवा थेट ग्राहक मंचात दाद मागा.

घराची मूळ कागदपत्रे का महत्त्वाची आहेत?

कायदेशीर तज्ज्ञांच्या मते, मालमत्तेची मूळ कागदपत्रे हा त्या मालमत्तेचा सर्वात महत्त्वाचा पुरावा असतो. ही कागदपत्रे गमावल्यास

मालमत्तेची विक्री करताना अडचणी येतात. वारसा हक्क सिद्ध करताना कायदेशीर अडथळे येऊ शकतात. मालमत्तेवर पुन्हा कर्ज (Refinancing) मिळत नाही. भविष्यात नको ते कायदेशीर वाद निर्माण होतात. त्यामुळे घराची मूळ कागदपत्रे तुमच्याकडे असायलाच हवीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com