एक सिम, नंबरही तोच, तरी ऑपरेट होतील दोन फोन; टेक्नॉलॉजिमध्ये येणार नवी क्रांती

iPhone Feature : Appleच्या आगामी iPhone Handoff फीचरमुळे एकच फोन नंबर दोन iPhoneवर वापरता येतील. एक फोन Primary तर दुसरा Companion म्हणून जोडला जाईल; मात्र नेटवर्क ऑपरेटरचा सपोर्ट आवश्यक असेल.
iPhone Feature :
Apple Handoff one number on two iPhonessaam tv
Published On

आपण सगळ्यांनी एक फोन दोन सिम अशी टेक्नॉलॉजी पाहिली असेल पण जर एकाच सिम कार्ड किंवा एका नंबरवर दोन फोन वापरता आले तर? कदाचित तुम्हाला ही गोष्ट अशक्य वाटत असेल पण हे होणार आहे. ही बातमी वाचून तुम्हाला धक्का बसेन. कारण या सिमसाठी वेगवेगळे रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही. याशिवाय एका फोनवर इंटरनेट वापरण्यासाठी दुसऱ्या फोनचा हॉटस्पॉट सुरू करण्यासारख्या कटकटींचीही गरज भासणार नाहीये.

iPhone Feature :
Mobile Ban: राज्यातील प्रमुख मंदिरात मोबाईल वापरण्यास बंदी; विजय सरकारनं का घेतला निर्णय?

काय बसला ना धक्का, आता तुम्ही म्हणाल कोणती कंपनी हे नवीन तंत्रज्ञान विकसित करत आहे. हे जाणून घ्यायची तुमची उत्सुकता शिगेला पोहचली असेल. काळजी करू नका तुमची उत्सुकता अधिक न ताणता आम्ही तुम्हाला सर्व माहिती या लेखात देतोय. तर ॲपल कपंनी 'iOS 27' सह 'हँडऑफ' (Handoff) नावाचे एक वैशिष्ट्य आणण्याच्या तयारीत आहे. याच्या मदतीने एका आयफोनमधील सिम कार्ड दुसऱ्या आयफोनवरही वापरता येईल. हे फीचर अगदी तशाच प्रकारे काम करेल ज्याप्रमाणे सध्या ॲपल वॉच आयफोनसोबत काम करते. यामुळे वेगवेगळ्या आयफोन्ससाठी स्वतंत्र सिम कार्ड्स घेण्याची गरज राहणार नाही.

iPhone Feature :
Bluetooth Hacking : तुम्ही सुद्धा Bluetooth ऑन ठेवताय? पण ही चूक पडू शकते महागात , तुमचा फोन होऊ शकतो हॅक

हे फीचर्स 'आयफोन हँडऑफ' (iPhone Handoff) या नावाने सादर केले जाऊ शकते. ॲपलने जून २०२६ मध्ये झालेल्या WWDC कार्यक्रमादरम्यान iOS 27 सोबत या वैशिष्ट्याची झलक दाखवली होती. आता, 'मॅकरूमर्स'ने (MacRumors) उल्लेख केलेला एक व्हिडिओ आणि Xcode 27 मधील सिम्युलेशनद्वारे हे वैशिष्ट्य नेमके कसे काम करते, हे स्पष्ट झाले आहे. वृत्तांनुसार, हे फीचर्स युजर्सला एकाच सक्रिय मोबाइल क्रमांकाचा वापर दोन वेगवेगळ्या आयफोन्सवर (iPhones) करण्याची परवानगी देते.

हे कसे सेट करायचे?

हे फीचर्स सुरू करणे अत्यंत सोपे आहे. यासाठी, 'Settings' मधील 'Cellular' सेक्शनमध्ये जा.

त्यानंतर, 'iPhone Handoff' वर टॅप करा आणि तुमचा मुख्य फोन 'Main iPhone' म्हणून निवडा.

यामुळे तुमचा प्राथमिक eSIM आणि नेटवर्कशी संबंधित सर्व मुख्य सेटिंग्स या डिव्हाइसवर सक्रिय राहतील.

आता, तुम्हाला तुमचा दुसरा आयफोन 'Companion iPhone' म्हणून पेअर करावा लागेल.

ही प्रणाली या दुसऱ्या डिव्हाइसवर एक सहयोगी ई-सिम आपोआप स्थापित करेल.

हे अगदी फोनच्या सिमसोबत जोडलेल्या स्मार्टवॉचप्रमाणे कार्य करेल. ज्यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष सिम कार्ड टाकण्याची गरज न पडता कॉलिंग आणि इंटरनेट सेवा वापरता येतील.

एकदा सेटअप पूर्ण झाला की, तोच मोबाईल क्रमांक दोन्ही आयफोन्सवर (iPhones) सक्रिय होतील.

या फीचरचा काय फायदा?

या फीचरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, वापरकर्ते कोणत्याही वेळी दोन उपकरणांमध्ये (डिव्हाइसेसमध्ये) सहजपणे अदलाबदल करू शकतील; यासाठी पुन्हा मॅन्युअली कनेक्ट करण्याची किंवा सिम कार्ड बदलण्याची (सिम स्वॅप करण्याची) गरज भासणार नाही.

तसेच, एका फोनवरील इंटरनेटचा वापर दुसऱ्या फोनवर करण्यासाठी एका फोनला हॉटस्पॉट म्हणून वापरण्याचीही आवश्यकता राहणार नाही.

दोन्ही फोन वापरण्यासाठी तुम्हाला वेगळे सिम कार्ड्स खरेदी करण्याची किंवा वेगळे रिचार्ज प्लॅन्स घेण्याची गरज भासणार नाही.

या प्रणालीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यात सिम कार्डची 'क्लोनिंग' (प्रत तयार करणे) केली जात नाही; सर्व नियंत्रण मुख्य फोनकडेच राहते. परिणामी, सेल्युलर डेटा आणि नेटवर्क सेटिंग्जवरील नियंत्रण प्राथमिक आयफोनकडेच कायम राहते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com