UPI: ग्राहकांना मोठा दिलासा! आता UPI पेमेंटवर मिळणार डिस्काउंट; सरकार नवी योजना लागू करण्याच्या तयारीत

Discount on UPI Payment: यूपीआय पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता प्रत्येक यूपीआय ट्रान्झॅक्शनवर डिस्काउंट मिळणार आहे. सरकार याबाबत नवीन योजना लागू करण्याच्या तयारीत आहे.
Digital Payment
Digital PaymentSaam Tv
Published On

आजकाल सर्वकाही डिजिटल झाले आहे. त्यामुळे अगदी भाजी खरेदीपासून करण्यापासून ते कोणतीही मोठी वस्तू घेण्यासाठी तुम्ही यूपीआय पेमेंच करतात.यूपीआय पेमेंटबाबत सरकार लवकरच मोठा निर्णय घेणार आहे. सरकार कोणत्याही प्रकारचे पेमेंट करण्यावर डिस्काउंट देण्याची शक्यता आहे. सरकार सध्या या योजनेवर काम करत आहे.

Digital Payment
New Rules : गॅस सिलिंडर, UPI आणि बँक...;1 एप्रिलपासून नियम बदलणार, थोडं दुर्लक्ष महागात पडणार, जाणून घ्या महत्त्वाचे बदल

सरकार सध्या यूपीआय पेमेंट स्वस्त करण्याच्या योजनेवर काम करत आहे. जर ही योजना लागू केली तर यूपीआय पेमेंट करणे क्रेडिट कार्डपेक्षा स्वस्त होणार आहे. क्रेडिट कार्डवर सध्या २-३ टक्के शुल्क आकारले जाते. याचा मर्चंट डिस्काउंट रेट म्हणतात. जर तुम्ही १०० रुपयांची वस्तू खरेदी केली तर त्यातील ९७-९८ रुपये दुकानदाराला मिळणार आहे. दरम्यान, यूपीआय पेमेंटवर कोणतेही शुल्क लागत नाही. त्यामुळे संपूर्ण पैसे हे दुकानदाराला मिळते.

आता ग्राहकांनाही मिळणार फायदा

ग्राहक व्यव्हार मंत्रालय सध्या असा विचार करत आहे की,यूपीआय पेमेंट करणाऱ्या ग्राहकांनाही फायदा मिळेल. आतापर्यंत फक्त दुकानदारांना फायदा मिळत होता. क्रेडिट कार्डवर २-३ टक्के शुल्क लागते. यूपीआयवर हे शुल्क लागत नाही. त्यामुळे यूपीआयला प्रोत्साहन मिळेल.

Digital Payment
UPI New Rule: UPI वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! NPCI ने जारी केले नवे नियम

ही योजना लागू करण्यापूर्वी सरकार जूनमध्ये संबंधितांशी चर्चा करेल. यामध्ये ई कॉमर्स कंपन्या, एनपीसीआय, बँका, पेमेंट व ग्राहक संघटनांचा समावेश असेल. या बैठकीनंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. पेमेंट काउन्सिल ऑफ इंडियाने यूपीआय आणि रुपे डेबिट कार्डवरही MDR लागू करण्याची मागणी केली होती. मात्र, सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिलेली नाही.

यूपीआय ट्रान्झॅक्शन होणार जलद

एनपीसीआयच्या नवीन नियमांनुसार, १६ जून २०२५ पासून यूपीआय व्यव्हार फक्त १५ सेकंदातच पूर्ण होतील.यासाठी ३० सेकंदाचा कालावधी लागायचा.

Digital Payment
Rajiv Yuva Scheme: स्वतः चा बिझनेस सुरु करण्यासाठी सरकार देतंय ४ लाखांचे लोन; राजीव युवा योजना नक्की आहे तरी काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com