UPI New Rule: UPI वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! NPCI ने जारी केले नवे नियम

NPCI New Rule For UPI: नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने यूपीआयबाबत नवीन नियम लागू केला आहे. यामुळे अनेकदा चुकून दुसऱ्याच्या खात्यात यूपीआयद्वारे ट्रान्सफर होण्याच्या घटना घडणार नाही.
UPI Payment
UPI PaymentSaam Tv
Published On

सध्या सर्वकाही डिजिटल झाले आहे. आपण भाजी घेण्यापासून ते अगदी काही मोठी वस्तू घ्यायची असेल तरीही ऑनलाइन पेमेंट करतो. त्यामुळे सध्या कोणीच रोख रक्कम ठेवत नाही. सर्वजण क्यूआर कोड स्कॅन करतात आणि पैसे पाठवतात. देशातील लाख लोक रोज यूपीआयद्वारे कोट्यवधींचे ट्रान्झॅक्शन करते. अनेकदा आपल्याला एका नंबरवर पैसे पाठवायचे असतात परंतु ते चुकून दुसऱ्या नंबरवर जातात.यामुळे खूप प्रॉब्लेम होऊ शकतो.

जर तुमचे पैसे दुसऱ्या कोणत्या अकाउंटला ट्रान्सफर झाले तर अनेक अडचणी येतात. परंतु आता नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने यूपीआयबाबत नवीन नियम जारी केले आहेत.

UPI Payment
India Pakistan Digital Strike: भारत सरकारचा डिजिटल स्टाईक; पाकिस्तानच्या या OTT कंटेंटवर बंदीचा निर्णय

यूपीआयबाबत NPCI चे नियम (UPI New Rule)

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने यूपीआयबाबत नवीन नियम लागू केले आहेत. या नियमांअतंर्गत तुमचे पैसे चुकीच्या खात्यात ट्रान्सफर होणार आहे. यूपीआयद्वारे P2P म्हणजे पीअर टू पीअर आणि P2PM म्हणजे पीअर टू पीअर मर्चेंट. आता कोणत्याही प्रकारचे ट्रान्झॅक्शन करताना तुम्हाला खातेधारकांचे नाव दिसेल जे सीबीएस म्हणजे कोअर बँकिंग सिस्टीममध्ये रजिस्टर असेल.

याचाच अर्थ असा की, तुम्ही जेव्हा पेमेंट कराल तेव्हा तुम्हाला बँक खात्यात नोंदणीकृत असलेलेच नाव दिसेल. या व्यक्तीचा नंबर तुमच्या फोनमध्ये वेगळ्या नावाने सेव्ह असतो तसेच बँकेत वेगळे नाव असते. त्यामुळे गोंधळ होतो. त्यामुळे कधीकधी पैसे चुकीच्या अकाउंटमध्ये जमा होतात. परंतु आता असं काही होणार नाही. हे नवीन नियम ३० जून २०२५ पासून यूपीआय अॅपसाठी लागू होईल.

UPI Payment
Safety App: भारत-पाकिस्तान तणाव वाढला! तुमच्या सुरक्षिततेसाठी हे ५ सेफ्टी अ‍ॅप्स आत्ताच डाउनलोड करा

UPI द्वारे पैसे चुकीच्या अकाउंटमध्ये गेले तर

कधीकधी आपल्याकडून चुकून दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होतात. अशावेळी त्या व्यक्तीला फोन करुन मी तुमच्या खात्यात पैसे पाठवले आहेत मला परत करा,असं सांगावे. अनेकदा पैसे परत न येण्याची शक्यता असते.जर त्या व्यक्तीने पैसे परत दले नाही तर तुम्ही बँकेत तक्रार करु शकतात. याचसोबत १८००१२०१७४० या नंबरवर कॉल करुन तक्रार करु शकतात.

UPI Payment
UPI News: चुकूनही दुसऱ्याला जाणार नाही पैसे; UPI मध्ये होणार 'हा' मोठा बदल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com