Manasvi Choudhary
लाडकी बहीण योजनेत आता महिलांच्या अर्जांची पुन्हा पडताळणी होणार आहे.
लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली अनेकांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे.
लाडकी बहीण योजनेत ज्या महिला नियमाबाहेर जाऊन पैसे घेतात. त्यांना आता पैसे मिळणार नाहीत.
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांकडे चारचाकी वाहन नसावे.
लाडकी बहीण योजनेच्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त नसावे.
लाडकी बहीण योजनेतील महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.
अनेक बांग्लादेशी महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळे महिला व बालविकास विभागाने पुन्हा अर्जांची काटेकोरपणे पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत.