National Highway आणि Expressway मार्गांवर वाहनधारकांना मिळणार 'या' खास सुविधा; NHAI कडून प्रादेशिक कार्यालयांना निर्देश

NHAI Roadside Support Services : आता राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवर वाहनांची दुरुस्ती आणि पंक्चर काढण्याची सुविधा उपलब्ध असेल; NHAI ने आपल्या प्रादेशिक कार्यालयांना यासंदर्भात सूचना दिल्या आहेत.
NHAI Roadside Support Services  :
NHAI vehicle repair service on national highwayssaam tv
Published On
Summary
  • राष्ट्रीय महामार्ग आणि एक्स्प्रेसवेवर वाहन दुरुस्ती व पंक्चर काढण्याच्या सुविधा उपलब्ध होणार.

  • NHAI ने यासंदर्भात सर्व प्रादेशिक कार्यालयांना आवश्यक निर्देश दिले आहेत.

  • वाहन बिघाड झाल्यास प्रवाशांना तातडीची मदत मिळणार

देशभरात राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गांचे जाळे विस्तारलं जात आहे.एका दिवसाला २५ किलोमीटर रस्ता बांधणीचं काम सतत चालू आहे. परंतु या महामार्गांच्या बाजुला वाहनधारकांसाठी आणि प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध नाहीयेत. त्यामुळे नॅशनल हायवेनं प्रवास करणाऱ्यांमध्ये नाराजी आहे. परंतु आता NHAI ही बाब लक्षात घेत राष्ट्रीय महामार्ग आणि एक्स्प्रेसवेवर वाहनांची दुरुस्ती किंवा पंक्चर काढण्यासाठी कोणतीही संघटित सेवा उपलब्ध नव्हती. यामुळे 'नॅशनल हायवेज ऑथॉरिटी ऑफ इंडिया'ने (NHAI) आता या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

NHAI Roadside Support Services  :
Bullet Train Recruitment 2026: नोकरीची मोठी संधी! बुलेट ट्रेनमध्ये 224 जागांची भरती, पात्रता आणि शेवटची तारीख जाणून घ्या

NHAI च्या अंतर्गत असलेल्या 'नॅशनल हायवेज लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट लिमिटेड' (NHLML) या कंपनीने सर्व प्रादेशिक कार्यालयांना रस्त्याच्या कडेला उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधांमध्ये टायर पंक्चर दुरुस्ती आणि वाहन दुरुस्तीच्या सुविधांचा समावेश करण्याचे निर्देश दिलेत. महामार्गालगतच्या सुविधांचा एक भाग म्हणून वाहनांची दुरुस्ती करणारी दुकाने आणि पंक्चर दुरुस्ती सेवा लवकरात लवकर सुरू करण्याबाबत सूचना देण्यात आल्याचे एनएचएआयने (NHAI) म्हटलंय.

प्रवासाचा अनुभव सुधारणे, वाहनांच्या दुरुस्तीसाठी लागणारा वेळ कमी करणे, रस्ते सुरक्षा वाढवणे आणि राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणारे व मालवाहतूकदार यांना त्वरित मदत पुरवणे या उद्देशांनी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्राधिकरणाच्या मते, महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना वाहन बंद पडल्यास किंवा आणीबाणीच्या प्रसंगी वेळेवर मदत मिळावी, यासाठी अनेक राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवर वाहन दुरुस्ती व पंक्चर दुरुस्ती सेवांची आवश्यकता असल्याचे दिसून आले आहे.

प्रवाशांच्या सोयीचा विचार करून NHLML ही संस्था 'पीपीपी' (PPP) मॉडेलअंतर्गत दीर्घकालीन भाडेतत्त्वावर रस्त्याच्या कडेला शॉप उभारले जातील. त्यात आधुनिक सुविधांचे जाळे विकसित केलं जाईल. भाडेकरूंशी असलेल्या विद्यमान करारांनुसार, अशा प्रत्येक सुविधा केंद्रासाठी अनिवार्य असलेल्या सुविधांव्यतिरिक्त इतर अनेक सुविधाही विकसित केल्या जाऊ शकतात. यामध्ये वाहनांची दुरुस्ती करणारी दुकाने आणि पंक्चर दुरुस्तीच्या सुविधांचाही समावेश करण्यात आलाय.

NHAI Roadside Support Services  :
Vande Bharat: आता तिकीट कन्फर्म! पुणे-नागपूर वंदे भारत ट्रेनमध्ये मोठा बदल; रेल्वे प्रशासनाचा काय आहे प्लॅन? वाचा

वाहतूक क्षेत्रासाठी पहिल्यांदाच एक समर्पित संशोधन केंद्र उभारले जाणार आहे. रस्ते वाहतूक क्षेत्रात परिणाम-आधारित धोरणे निश्चित करण्याच्या आणि उच्च-गुणवत्तेच्या संशोधनाला चालना देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. एनएचएआयने (NHAI) नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च (NCAER) सोबत सामंजस्य करार केला आहे.

या करारानुसार एनसीएईआर (NCAER) येथे 'एनएचएआय सेंटर फॉर इकॉनॉमिक्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन, मोबिलिटी अँड लॉजिस्टिक्स'ची स्थापना करण्यात येणार आहे. हे वाहतूक, गतिशीलता (मोबिलिटी) आणि लॉजिस्टिक्स यांच्या अर्थशास्त्रावर लक्ष केंद्रित करणारे देशातील पहिले कायमस्वरूपी आणि स्वतंत्र संशोधन केंद्र असणार आहे.

NHAI चे अध्यक्ष संतोष कुमार यादव यांच्या मते, हे केंद्र परिवहन, गतिशीलता (mobility) आणि लॉजिस्टिक्स या क्षेत्रांतील उपयोजित आर्थिक संशोधनासाठी एक समर्पित व्यासपीठ म्हणून काम करेल. रस्ते आणि परिवहन क्षेत्रातील दीर्घकालीन नियोजन, गुंतवणूक आणि धोरणनिर्मितीसाठी उपयुक्त ठरतील अशा कृतीयोग्य शिफारशी तयार करणे हा याचा उद्देश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com