Bullet Train Recruitment 2026: नोकरीची मोठी संधी! बुलेट ट्रेनमध्ये 224 जागांची भरती, पात्रता आणि शेवटची तारीख जाणून घ्या

Railway Vacancy: भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी NHSRCL ने २२४ पदांची भरती सुरू केली आहे. ज्युनिअर इंजिनिअर, ट्रेन मॅनेजर अशा अनेक पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
Bullet Train Recruitment 2026
Bullet Train Recruitment 2026google
Published On

नोकरदारवर्गासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. प्रत्येकालाच कामाला जाऊन त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. काहीजण उच्च शिक्षण घेऊन चांगल्या पगाराची नोकरी करतात. बऱ्याच जणांचं ठरलेलं असतं की आपण नोकरी कोणत्या क्षेत्रात किंवा कोणत्या ठिकाणी करायची. तुम्ही जर भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनमध्ये नोकरी करायला इच्छूक असाल तर ही संधी अजिबात गमावू नका.

मुंबई - अहमदाबाद हाय स्पीड रेल कोरिडोर लागू करणारी एजन्सी, नॅशनल हाय स्पीड रेल कोर्पोरेशन लिमिडेट ( NHSRCL) ने तांत्रिक, ऑपरेशनल आणि व्यवस्थापकीय पदांसाठी २२४ जागांची भरती सुरू केली आहे. NHSRCL ने जाहीर केलेल्या माहितीनुसार, या रिक्त पदांची भरती भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेन प्रोजेक्टसाठी सुरु आहे. त्यामुळे इच्छूक उमेदवारांची उत्सुकता वाढली आहे.

Bullet Train Recruitment 2026
Chalisgaon Tourism : धुकं, हिरवळ अन् फेसाळलेला धबधबा! पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात चाळीसगावजवळची 'ही' 5 ठिकाणं

तर जाहीर केलेल्या माहितीनुसार, तब्बल २२४ रिक्त पदांसाठी ही भरती सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असेल. इच्छूक उमेदवार NHSRCL च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. तर यामध्ये २०९ पदे नॉन - एक्झिक्युटिव्ह श्रेणीतल्यांसाठी असणार आहेत. तर १५ एक्झिक्युटिव्ह पदासाठी असणार आहेत. त्यामध्ये ज्युनियर इंडिनिअर पदांसाठी सर्वात जास्त भरती केली जाणार आहे. यामध्ये इलेक्ट्रिकल, सिव्हिल, ट्रॅक, सिग्नलिंग, टेलिकॉम तसेच रोलिंग स्टॉकसारख्या अनेक विभागाचा समावेश आहे.

बुलेट ट्रेनच्या या भरतीमध्ये इ ट्रेन मॅनेजर स्टेशन मॅनेजर, डेपो कंट्रोलर आणि ऑपरेशन्स कंट्रोलर पदांची सुद्धा भरती होणार आहे. डेप्युटी इंजिनिअर आणि आयटी क्षेत्रातल्या वरिष्ठ पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. याची वयोमर्यादा ही १८ ते ४५ वर्ष अशी आहे. तर याची शेवटी तारीख ही एक्झिक्युटिव्ह पदासाठी ९ जुलै २०२६ असेल तर नॉन एक्झिक्युटिव्ह पदांसाठी १४ जुलै अशी असणार आहे. त्यामुळे आधी तुम्ही अधिकृत वेबसाइटला अर्ज केला पाहिजे.

Bullet Train Recruitment 2026
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2027 आधीच वाढणार पगार? मोठी अपडेट समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com