Chalisgaon Tourism : धुकं, हिरवळ अन् फेसाळलेला धबधबा! पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात चाळीसगावजवळची 'ही' 5 ठिकाणं

Sakshi Sunil Jadhav

पावसाळ्यातले वातावरण

पावसाला नुकतीच सुरुवात झाली आहे. मस्त थंड वातावरणात तुम्ही फिरायला जाण्याचा प्लान करत असाल तर पुढची माहिती खास तुमच्यासाठी आहे.

Monsoon destinations near Chalisgaon

धवलतीर्थ धबधबा

चाळीसगाव परिसरातला धवलतीर्थ धबधबा पावसाळ्यात पूर्ण जोमात वाहत असतो. उंचावरून कोसळणारे पाणी आणि हिरवागार परिसर असे तिथले वातावरण असते.

Best waterfalls in Maharashtra

केदारकुंड

डोंगररांगांच्या कुशीत वसलेले केदारकुंड हे निसर्गप्रेमी आणि ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी आवडते ठिकाण बनले आहे. पावसाळ्यात तिथे पाण्याचा प्रवाह जास्त सुंदर दिसतो.

Top waterfalls near Chalisgaon

पंचधारा धबधबा

पंचधारा धबधब्याची खासियत म्हणजे एकाच ठिकाणी पाच पाण्याचे प्रवाह दिसतात. त्यामुळे हा धबधबा पर्यटकांना खूप आवडतो.

Top waterfalls near Chalisgaon

वाक्कड धबधबा

वाक्कड धबधबा अजूनही अनेक पर्यटकांसाठी अनोळखी आहे. शांत वातावरण, डोंगर आणि धबधब्याचा नजारा मनाला वेगळाच आनंद देतो.

Maharashtra trekking spots

सिताखोरी

सिताखोरी हे फक्त पर्यटनस्थळ नाहीतर धार्मिक आणि ऐतिहासिक गोष्टींसाठीही प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात तुम्हाला इथे धबधबे आणि हिरवाई पर्यटकांना आकर्षित करेल.

Waterfall trekking Maharashtra

पावसाळ्यात पर्यटकांची वाढती गर्दी

जुलै-ऑगस्ट महिन्यात या धबधब्यांवर मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडिओंमुळे लोकप्रियता वाढत आहे.

Waterfall trekking Maharashtra

फोटोग्राफीसाठी परफेक्ट डेस्टिनेशन

धबधबे, दऱ्या आणि हिरवागार निसर्ग यामुळे हा परिसर फोटोग्राफर्ससाठी स्वर्ग मानला जातो. प्रत्येक ठिकाणी अप्रतिम फोटो पॉइंट्स उपलब्ध आहेत.

Rainy season attractions

विकेंड ट्रिपसाठी उत्तम पर्याय

नाशिक, जळगाव, औरंगाबाद आणि धुळे येथून अनेक पर्यटक विकेंडला या ठिकाणांना भेट देतात. कमी खर्चात सुंदर पर्यटनाचा अनुभव येथे मिळतो.

Jalgaon tourist places

NEXT: Jioच्या ₹198 रुपयांच्या रिचार्जमध्ये दिवसाला मिळणार 2 जीबी डेटा अन् अनलिमिटेड कॉलिंग

Jio Recharge Plan | google
येथे क्लिक करा