

नव्या वेतन आयोगाअंतर्गत अनेक महत्वाचे नियम बदलण्यात आले आहेत. ही कर्मचाऱ्यांठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. जे कर्मचारी त्यांच्या ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त काम करतात, त्यांना आता त्याचे दुप्पट वेतन मिळेल. या मोठ्या निर्णयामुळे सगळ्याच कर्मचाऱ्यांना आनंद होणार आहे. याने कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे आणि जास्तीच्या कामाचे पैसे सुद्धा मिळणार आहेत.
ओव्हरटाईमचे महत्वाचे नियम काय? (wage code)
वेतनाच्या नव्या नियमांनुसार, कामाच्या नेहमीच्या ठरलेलेल्या वेळेपेक्षा जास्त काम केलं तर त्याचा मोबदला तुम्हाला दिला जाईल. तसेच त्यामध्ये तुम्हाला तुमच्या पगाराच्या दुप्पट दराने मोबदला दिणं बंधनकारक असणार आहे. म्हणजेच तुम्हाला २ तास जास्त काम केल्याने त्याचा तासांचा पगार मिळेल. तसेच तुम्हाला आठवड्यात ४८ तासच काम करणे बंधनकारक ठरेल.
१५ मिनिटे जास्तीचे काम केल्याने पैसे मिळणार का?
१५ मिनिटे जास्तीचे काम केल्यावर त्याचे पैसे मिळणार का ? असा प्रश्न अनेकांच्या मनात येत असतो. वेतनाच्या नव्या नियमात हा एक महत्वाचा बदल आहे. यामध्ये ओव्हरटाईमसाठीची 'राउंडिंग-ऑफ' पद्धत सुरु केली आहे. यामध्ये अगदी थोड्या प्रमाणात केलेलं जास्तीचं कामसुद्धा मोजलं जाणार आहे.
जर एखादा कर्मचारी आपली शिफ्ट संपल्यानंतर १५ ते ३० मिनिटे जरी काम करत असेल, तर ती ३० मिनिटं ओव्हरटाईम म्हणून ग्राह्य धरली जातील. यामुळे जे कर्मचारी आपली शिफ्ट संपल्यानंतर थांबतात, त्यांना त्यांच्या जास्तीच्या वेळेसाठी योग्य मोबदला मिळेल याची खात्री होईल.
वेतन देण्याचे नियमही जास्त कडक करण्यात आले आहेत. जर एखाद्या कर्मचाऱ्याने राजीनामा दिला किंवा त्याला कामावरून काढून टाकलं, तर कंपनीने ओव्हरटाईमसह सर्व रक्कम शक्य तितक्या लवकर देणं बंधनकारक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.