PPF Calculation: PPF मध्ये गुंतवणूक करताय? मग हे नवं कॅल्क्युलेशन घ्या समजून, नाहीतर गमावाल लाखो रुपये

PPF Interest 2026 Calculation: PPF मध्ये योग्य वेळी गुंतवणूक न केल्यास मोठं नुकसान होऊ शकतं. ५ एप्रिलपूर्वी पैसे जमा केल्यास पूर्ण व्याज मिळतं, तर उशिरा गुंतवणूक केल्यास लाखोंचा तोटा संभवतो.
tax saving schemes India
best government schemes Indiagoogle
Published On

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे दिवसाला किमान २०० ते ३०० रुपयांचा खर्च होतोच. जेव्हा गरज असते तेव्हा मग पैसे उरतच नाहीत. त्यामुळे पगार महिन्याला कसा संपतो? हेच कळतच नाही. अशावेळेस लोक सेविंग करणं हा पर्याय निवडतात. त्यासाठी पोस्टात पैसे साठवण्याचा पर्याय सगळ्यांना सोयीस्कर वाटतो. मात्र यामध्ये काही नवे बदल करण्यात आले आहेत. हे बदल नव्या आर्थिक महिन्यापासून म्हणजेच एप्रिलपासून सुरु केले आहेत. जे तुम्ही केले नसतील तर भविष्यात तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात.

पब्लिक प्रोविडेंट फंड ( Public Provident Fund)

तुम्ही जर पोस्टातल्या PPF म्हणजे पब्लिक प्रोविडेंट फंड या सरकारी योजनेत गुंतवणुक केली असेल तर, एप्रिल- जून २०२६ या कालावधीसाठी पीपीएफ योजनेचा व्याजदर ७.१% असणार आहे. ही एक दीर्घकालीन सरकारी योजना आहे. जी सर्वात जास्त व्याजदर देते.

tax saving schemes India
High Blood Pressure: रोजच्या या ४ चुकांमुळे वाढतो BP; वेळीच व्हा सावध, डॉक्टरांनी सांगितली महत्वाची माहिती

PPF चे नवे नियम काय?

तुम्हाला जर पैशांची बचत करण्यासाठी नव्या गुंतवणूकी करायच्या असतील, तर संपूर्ण वर्ष व्याज मिळेल अशी ही योजना आहे. ५ एप्रिलपूर्वी तुमचे पीपीएफ खाते उघडून त्यात १.५ लाख रुपये गुंतवल्याने तुम्हाला हा फायदा मिळणार आहे. आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला केलेली एक छोटी गुंतवणूक भविष्यात मोठ्या रकमेत वाढू शकते.

पीपीएफचे कॅल्क्युलेशन सोप्या भाषेत समजून घ्या

पीपीएफच्या व्याजाचे कॅल्क्युलेशन हे महिन्याच्या ५ तारखेपासून आणि महिन्याच्या शेवटापर्यंतच्या किमान शिल्लकीवर केली जाते. याचा अर्थ असा की, जर तुम्ही १ एप्रिल ते ५ एप्रिल दरम्यान पैसे जमा केले, तर तुम्हाला संपूर्ण महिन्याचे व्याज मिळू शकतं.

जर तुम्ही ६ एप्रिल रोजी गुंतवणूक केली असेल, तर तुम्हाला त्या महिन्याचे व्याज मिळणार नाही आणि तुमची कमाई एका महिन्याने कमी होईल. समजा तुम्ही वार्षिक १.५ लाख रुपये गुंतवले तर १ ते ५ एप्रिल दरम्यान केलेल्या गुंतवणुकीवर संपूर्ण वर्षासाठी व्याज मिळेल. ७.१% दराने हे अंदाजे १०,६५० रुपये होतं.

जर तुम्ही ६ एप्रिलनंतर गुंतवणूक केली, तर तुम्हाला फक्त ११ महिन्यांचे व्याज मिळेल, जे अंदाजे ९,७६३ रुपये आहे. म्हणजेच एका दिवसाच्या उशीराने८८७ चं नुकसान होऊ शकतं. त्याचप्रमाणे, १५ वर्षांच्या कालावधीत, जर तुम्ही दरवर्षी १ ते ५ एप्रिल दरम्यान गुंतवणूक केली, तर तुमची एकूण २२.५ लाख रुपयांची गुंतवणूक अंदाजे ४०.६८ लाख रुपये होईल.

जर तुम्ही दरवर्षी गुंतवणूक करायला उशीर केला, तर तुमच्याकडे फक्त अंदाजे ३७.८० लाख रुपये जमा होतील. याचा अर्थ अंदाजे ३ लाख रुपयांचे नुकसान होईल.

tax saving schemes India
Jio Recharge: फक्त 198 रुपयांमध्ये दिवसाला मिळेल 2 GB डेटा, वाचा Jioची खास ऑफर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com