

नवीन कामगार कायदा १ एप्रिलपासून लागू
ग्रॅच्युटी, सॅलरीच्या नियमात बदल
सर्व क्षेत्रातील कामगारांसाठी कामाची वेळ निश्चित
केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने नवीन कामगार संहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. २१ नोव्हेंबर २०२५ रोजी या नवीन कायद्याबाबत घोषणा करण्यात आली होती. हा कायदा आता प्रत्यक्षात १ एप्रिलपासून लागू होणार आहे. हा कायदा लागू झाल्यानंतर कामगारांच्या पगारावर थेट परिणाम होणार आहे.
केंद्र सरकारने २९ कामगार संहितांचे ४ कामगार संहितांमध्ये रुपांतर केले आहे. यामध्ये वेतन संहिता 2019, औद्योगिक संबंध संहिता 2020, सामाजिक सुरक्षा संहिता 2020, व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामकाजाची अट संहिता 2020 याचा समावेश आहे. यामुळे कामगारांना फायदे आणि तोटे होणार आहेत. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या सीटीसीच्या ५० टक्के रक्कम ही बेसिक सॅलरी असणे अनिवार्य आहे.
नवीन कामगार संहितेत बदल काय? (New Labour Code Changes)
ग्रॅच्युटीची मर्यादा
आता स्थायी कर्मचाऱ्यांप्रमाणेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना रजा, वैद्यकीय, सामाजिक सुरक्षेचा लाभ मिळणार आहे. याचसोबत ग्रॅच्युटी एका वर्षानंतरच मिळणार आहे.यामुळे थेट नियुक्त्यांचे प्रमाण वाढेल.
गिग वर्कर्ससाठी निर्णय
आता गिग वर्कर्स किंवा प्लॅटफॉर्म कामगारांना अॅग्रीगेटर संस्थांना वार्षिक उलाढालीच्या १ ते २ टक्के निधी देणे बंधनकारक केले आहे. त्यांना आधार लिंक युनिव्हर्सल नंबर दिला जाणार आहे.
कंत्राटी कामगार
कंत्राटी कामागारांची रोजगार क्षमता आणि सामाजिक सुरक्षा वाढणार आहे. त्यांना १ वर्षानंकर ग्रॅच्युटी मिळणार आहे. याचसोब वार्षिक आरोग्य तपासणी मोफत करता येणार आहे.
महिला कामगार
महिला कामगारांना समान कामासाठी समान वेतन देणे अनिवार्य असणार आहे. त्यांच्या संमतीने रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. तसेच तक्रार निवारण समित्यांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व असणार आहे.
युवक कामगार
सर्व कामगारांना किमान वेतनाची हमी देणे. सर्व कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र देणे बंधनकारक असणार आहे. रजेच्या काळातही वेतन देणे आवश्यक आहे.
सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग कामगार
सामाजिक सुरक्षा संहिता २०२० अंतर्गत सूक्ष्म, लघु आणि मध्य उद्योग कामगारांचा समावेश करण्यात आला आहे. सर्वांना उपहारगृहे, विश्रांतीगृह, पिण्याचे पाणी अशा मूलभूत सुविधा उपलब्ध करुन द्यायच्या आहेत. ठरावीक कामाचे तास, दुप्पट ओव्हरटाइम देणे गरजेचे आहे.
बीडी व सिगार कामगार
बीडी व सिगार कामगारांना ८-१२ तास, आठवड्याला एकूण ४८ तासाचे काम करणे अनिवार्य असणार आहे.कर्मचाऱ्यांना वेतन वेळेत जेणे गरजेचे आहे. वर्षभरात ३० दिवस काम केल्यावर तुम्ही बोनससाठी पात्र असणार आहात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.