Rule Change: LPG गॅसच्या किंमती, इन्कम ते रेल्वे तिकीट; १ एप्रिलपासून ५ नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम

Rule Change From 1st April 2026: नवीन आर्थिक वर्षात अनेक महत्त्वाचे बदल होणार आहे. एलपीजी गॅस ते इन्कम टॅक्सच्या नियमात बदल होणार आहे. यामुळे तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे.
Rule Change
Rule ChangeSaam Tv
Published On
Summary

१ एप्रिलपासून हे नियम बदलणार

एलपीजी गॅस, इन्कम टॅक्स ते रेल्वेच्या नियमात बदल

थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम

१ एप्रिल २०२६ पासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. या नवीन आर्थिक वर्षात अनेक नियम बदलणार आहेत. महिन्याच्या सुरुवातीला पैशांसंबंधित अनेक नियम बदलतात. त्याचसोबत आता आर्थिक वर्ष सुरु होणार आहे त्यामुळे हे नवीन नियम तुम्हाला माहित असायलाच हवेत. या नवीन नियमांमुळे थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे.

Rule Change
LPG Price: गॅस सिलेंडरच्या किंमती कमी होणार? भारताने ७ वर्षांनी पहिल्यांदाच इराणकडून खरेदी केला LPG

१ एप्रिलपासून हे नियम बदलणार (Rule Change From 1st April 2026)

एलपीजी, सीएनजीच्या किंमती (LPG Gas Price Change)

इंधनाच्या किंमती १ एप्रिलपासून बदलणार आहेत. दर महिन्याच्या १ तारखेला एलपीजीच्या नवीन किंमती अपडेट होतात. अशातच सध्या युद्धामुळे एलपीजीच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे भविष्यात नवीन किंमती जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीत बदल होऊ शकतो.

Rule Change
LPG Shortage Explainer: भारतात LPG अन् पेट्रोलचा पुरेसा साठा, मग एजन्सी, पेट्रोल पंपाबाहेर रांगा का? काय आहेत कारणे

इन्कम टॅक्सचे नवीन नियम

१ एप्रिलपासून नवीन आयकर कायदा लागू होणार आहे. १९६१ च्या कायदा बदलून नवीन कायदा लागू होणार आहे. यामध्ये अनेक बदल केले जाणार आहे. ज्याचा करदात्यांवर परिणाम होणार आहे. फॉर्म १६ बदलून आता फॉर्म १३१ असणार आहे.

एटीएमचे नियम (ATM Rule)

एटीएमच्या नियमात बदल केले जाणार आहे. आता एचडीएफसी बँकेने मोफत एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा कमी केली आहे. पंजाब नॅशनल बँकेने कार्डद्वारे पैसे काढण्याची मर्यादा कमी केली आहे. ही मर्यादा ५०,००० ते ७५,००० रुपयांपर्यंत मर्यादीत ठेवण्यात आले आहे.

पॅन कार्डचे नियम (Pan Card Rule)

पॅन कार्ड काढण्याच्या नियमात बदल केले जाणार आहे. याआधी फक्त आधार कार्डद्वारे तुम्ही पॅन कार्ड काढू शकत होता. मात्र, आता तुम्हाला पॅन कार्डसाठी अनेक कागदपत्रे जमा करावी लागणार आहे. यामध्ये शैक्षणिक कागदपत्रांचा समावेश आहे.

रेल्वेच्या तिकीटांच्या नियमात बदल (Railway Ticket Refund Rule)

आता रेल्वेचं तिकीट रद्द करणे महाग पडणार आहे. आता ट्रेनच्या ८ तास आधी तिकीट रद्द केल्यावर कोणताही रिफंड मिळणार आहे. ८ ते २४ तासात रद्द केले तर ५० टक्के रिफंड मिळणार आहे. २४ ते ७२ तासांमध्ये तिकीट रद्द केले तर २५ टक्के कापले जाणार आहेत.

Rule Change
New Rule : मोदी सरकारचा मोठा निर्णय, PNG कनेक्शन असेल तर LPG गॅस सिलिंडर बंद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com