LPG Price: गॅस सिलेंडरच्या किंमती कमी होणार? भारताने ७ वर्षांनी पहिल्यांदाच इराणकडून खरेदी केला LPG

LPG Gas Price: भारताने इराणकडून एलपीजी गॅस खरेदी केला आहे. २०२९ नंतर पहिल्यांदाच भारताने इराणकडून एलपीजी गॅस खरेदी केला आहे. हा व्यव्हार रुपयांमध्ये झाला आहे.
LPG Price
LPG PriceSaam tv
Published On
Summary

भारताने २०१९ नंतर पहिल्यांदाच केला इराणकडून गॅस खरेदी

रुपयांमध्ये होणार व्यव्हार

भारताला होणार फायदा

मध्य पूर्वेकडील देशांमधील युद्ध परिस्थितीचा जगावर परिणाम होत आहे. युद्धामुळे इंधना आणि एलपीजी गॅसची आयात कमी होत आहे. यामुळे एलपीजी आणि पेट्रोल डिझेलचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारताने एलपीजी गॅससाठी इराणसोबत भागीदारी केल आहे. २०१९ नंतर पहिल्यांदाच भारताने इराणकडून एलपीजी खरेदी केली आहे. अमेरिकेने इराणवरील काही निर्बंध शिथिल करण्याचे संकेत दिल्यानंतर हे पाऊल उचलण्याचे आले आहे.

LPG Price
Petrol Diesel Rate: राज्यात पेट्रोल डिझेलचे दर बदलले, परभणी-जळगावमध्ये सर्वात महाग, वाचा तुमच्या शहरातील दर

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणकडून येणारा एलपीजीचा साठा चीनला जाणार होता. परंतु भारताने संपर्क साधून हा साठा भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले. हे जहाज मंगळुरु बंदरात दाखल होईल. हा गॅस देशातील तीन तेल कंपन्यांना वितरित केला जाईल. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि बिंदुस्तान पेट्रोलियम या तीन देळातील सरकारी तेल कंपन्या आहे. त्या संपूर्ण देशात गॅस पुरवठा करतात.

रुपयांमध्ये व्यव्हार

या कराराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे पेमेंट मोड. या एलपीजी साठ्याचे पेमेंट भारत रुपयांमध्ये करणार आहे. त्यामुळे डॉलरवर कमी अवलंबून राहावे लागेल. यामुळे परकीय चलन साठ्यावरील दबाव कमी होणार नाही परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर रुपयाची विश्वासार्हता वाढणार आहे. या एका पाऊलामुळे भारताला खूप फायदा होणार आहे.

LPG Price
Fuel shortage: पेट्रोल-डीझेलच्या किंमतींचा भडका उडणार? केंद्र सरकारचं मोठं विधान, LPG तुडवड्यावरही दिली महत्वाची माहिती

भारत हा देशातील दुसरा सर्वात मोठा एलपीजी आयात करणारा देश आहे. देशातील गरजेपैकी ६० टक्के गॅस हा आयात होतो. यातील जास्तीत जास्त गॅस मध्य पूर्वेकडून भारतात येते. होमुर्झच्या सामुद्रधुनी येथे सुरु असलेल्या युद्धामुळे पुरवठा करण्यास व्यत्यय येतो. परंतु एलपीजी गॅसची खरेदी भारतासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.

LPG Price
LPG डिलिव्हरीमध्ये उशीर होतोय, सिलिंडरसाठी एक्स्ट्रा पैसे मागितले? कुठे आणि कशी कराल तक्रार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com