Banking News : चेकबुकचे नियम बदलले! १ जानेवारीपासून होणार लागू, वाचा नेमका काय झाला बदल?

cheque book rules : वाढत्या तंत्रज्ञानानुसार बँकिंग क्षेत्र वेगवान आणि अधिक सुरक्षित होत आहे. नव्या नियमानुसार अल्फा न्युमरिक कोड चेकबूकवर असणे गरजेचे असणार आहे. यामुळे गैरव्यवहारांवर आळा बसणार आहे.
Banking News :  चेकबुकचे नियम बदलले! १ जानेवारीपासून होणार लागू, वाचा नेमका काय झाला बदल?
Banking News : चेकबुकचे नियम बदलले! १ जानेवारीपासून होणार लागू, वाचा नेमका काय झाला बदल? meta ai
Published On

बँकिंग क्षेत्रातही सोईसुविधांचा वेगाने विस्तार होत आहे. ग्राहकांना व्यवहार करणे अधिक सोपे, सुरक्षित आणि जलद व्हावेत, यासाठी RBI च्या अंतर्गत बँका विविध सेवा ग्राहकांना पुरवतात. यासाठी बँकेकडून वेळोवेळी नियम आणि प्रक्रियांमध्ये बदल केले जातात. आता चेकबुकच्या वापराबाबतही काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे जुने चेकबुक वापरणाऱ्या ग्राहकांसाठी हे नियम जाणून घेणे महत्वाचे आहे.

बँकिंग प्रक्रिया जलद करण्यासाठी 1 जानेवारी 2027 पासून चेकबुकवर अल्फा न्युमरिक कोड हा अनिवार्य केला जाणार आहे. नवीन नियमांनुसार 31 डिसेंबरपासून अल्फा न्युमरिक कोड नसलेले चेक स्वीकारले जाणार नाहीत. जर तुम्ही या तारखेनंतर चेक टाकायचा प्रयत्न केलात तर तुमचा चेक बाऊन्स होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांनी लवकरात लवकर आपल्या नव्या चेकबुकसाठी अर्ज करावा, असे बँकने स्पष्ट केले आहे. हा नियम सार्वजनिक बँकांबरोबरच खासगी क्षेत्रातील बँकांना लागू असणार आहे.

Banking News :  चेकबुकचे नियम बदलले! १ जानेवारीपासून होणार लागू, वाचा नेमका काय झाला बदल?
SIM Card Rules : नवीन SIM कार्डसाठी नियम बदलला! KYC नंतरही आता बायोमेट्रिक पडताळणी

अल्फा न्युमरिक कोड का लागू केला जातोय?

अल्फा न्युमरिक कोड लागू करण्यामागे बँकिंग व्यवस्थेतील सुरक्षा वाढवणे, पैशांबाबत होणारे घोटाळे कमी करणे, व्यवहार अधिक वेगवान करणे हे RBI चे उद्दिष्ट आहे. अल्फा न्युमरिक कोड लागू केल्याने चेकची नकल करणे कठीण होईल. अंक आणि अक्षरांचे मिश्रण असल्याने बनावट चेक तयार करण्यावर आळा बसणार आहे. चेकवरील क्रमांक आणि रकमेमध्ये कोणीही फेरफार करू नये म्हणून ही प्रणाली काम करेल. याशिवाय अल्फा न्युमरिक कोडमुळे चेकवरील डेटा अचूकपणे आणि वेगाने स्कॅन व्हायला मदत मिळणार आहे.

तसेच चेक सेटलमेंटसाठी लागणारा वेळ होणार कमी होणार असल्याने ग्राहकांच्या खात्यात पैसे लवकर जमा होणे शक्य होणार आहे.

Banking News :  चेकबुकचे नियम बदलले! १ जानेवारीपासून होणार लागू, वाचा नेमका काय झाला बदल?
SIM Card Rules : नवीन SIM कार्डसाठी नियम बदलला! KYC नंतरही आता बायोमेट्रिक पडताळणी
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com