

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी मोठी माहिती दिली.
सुरत ते बिलीमोरा हा पहिला टप्पा पुढील वर्षी सुरू होण्याची शक्यता आहे.
बुलेट ट्रेन प्रकल्पाचे बांधकाम सध्या वेगाने सुरू आहे.
देशातील पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार? मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान पहिली ट्रेनचं लोकार्पण कधी होणार? याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक नवी अपडेट दिली आहे. त्यांनी सांगितलं की, मुंबई आणि अहमदाबाद दरम्यानच्या पहिल्या बुलेट ट्रेनचे बांधकाम सुरूय. "पुढील वर्षी, मुंबई-अहमदाबाद मार्गावरील बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा-सुरत आणि बिलीमोरा दरम्यान सुरू केली जाणार असल्याची माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिलीय.
बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा पुढील वर्षी सुरू केला जाईल आणि या प्रकल्पाचे काम अतिशय वेगाने होतंय. वैष्णव म्हणाले, "पुढच्या वर्षी आम्ही मुंबई-अहमदाबाद मार्गावरील सुरत आणि बिलीमोरा दरम्यानच्या बुलेट ट्रेनच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात करू. त्यानंतर आम्ही टप्प्याटप्प्याने पुढील काम करू—वापी ते सुरत त्यानंतर वापी ते अहमदाबाद, मग अहमदाबाद ते ठाणे आणि शेवटी अहमदाबाद ते मुंबई ट्रेन धावणार असल्याची माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिलीय.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे नोवोटेल हैदराबाद कन्वेंशन सेंटरमध्ये HYSEA GCCS आणि आयटी राउंडटेबल कार्यक्रमात बोलत होते. बुलेट ट्रेन टप्प्याटप्प्याने चालू करण्यात येणार असल्याचं सुतोवाच केले.
तीन प्रमुख बुलेट ट्रेन कॉरिडॉर्सच्या प्रकल्पामुळे हैदराबाद हे 'हाय-स्पीड हब' बनणार असल्याचेही अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजूर केलेले ५,४०० कोटी रुपयांचे रेल्वे बजेट तेलंगणामध्ये परिवर्तन घडवून आणत असल्याची माहितीही रेल्वेमंत्र्यांनी दिलीय.
मंत्री म्हणाले,"पुणे ते हैदराबाद, हैदराबाद ते चेन्नई आणि हैदराबाद ते बेंगळुरू यांना जोडणारा हा मार्ग संपूर्ण क्षेत्रासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. हैदराबाद हे 'हाय-स्पीड हब' म्हणून उदयास येईल. यामुळे मोठ्या प्रमाणावर विकास साधला जाईल आणि या संपूर्ण क्षेत्रातील अर्थव्यवस्था पूर्णपणे एकमेकांशी जोडल्या जातील."
अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, पुणे आणि हैदराबाद येथून सुरू होणाऱ्या सुरुवातीच्या प्रकल्पांमुळे प्रवासाचा वेळ दोन तासांनी कमी होणार आहे. हैदराबाद ते मुंबई प्रवासासाठी २ तास ५० मिनिटे, हैदराबाद ते अमरावतीसाठी १ तास १० मिनिटे, हैदराबाद ते चेन्नईसाठी ३ तास आणि हैदराबाद ते बेंगळुरूसाठी २ तास ३५ मिनिटे लागतील.
अशाप्रकारे हैदराबादला पंतप्रधान मोदींकडून तीन बुलेट ट्रेन कॉरिडॉर मिळतील. तेलंगणाला याचा प्रचंड फायदा होईल." यामुळे राज्यात मोठा बदल घडेल आणि तेलंगणाचा एक मोठा भाग बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कक्षेत येईल. बुलेट ट्रेनचे हे तीन मार्ग तेलंगणातील अनेक जिल्ह्यांना जोडले जातील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.