Big Breaking : ३३ हजारांहून अधिक 'लाडक्या बहिणी' कायमच्या अपात्र; नियमबाह्य लाभाची होणार वसुली

Ladki Bahin Yojana: अमरावती जिल्ह्यातल्या ३३ हजारांहून जास्त लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना कायमस्वरुपी अपात्र घोषित करण्यात आलं आहे. नियमबाह्य लाभ घेतल्याचं निष्पन्न झाल्याने शासनाकडून संबंधित रकमेची वसुली केली जाणार आहे.
Ladki Bahin latest news
Big Breakinggoogle
Published On

महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. ज्याने त्यांना आर्थिकदृष्ठ्या सक्षम व्हायला मदत होते. मात्र या योजनेबाबात अमरावती जिह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, जिल्ह्यातल्या तब्बल ३३ हजार ३०४ महिला लाभार्थी या योजनेसाठी कायमच्या अपात्र ठरल्या आहेत.

प्रशासनाने गेल्या ८ ते १० महिन्यांपासून राबवलेल्या ईकेवायसी मोहीमेनंतर हा मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे. लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची कागदपत्रे, उत्पन्नाची माहिती आणि इतर निकषांची सखोल तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीमध्ये अनेक अर्जदारांनी चुकीची माहिती दिल्याचं स्पष्ट झालं आहे.

Ladki Bahin latest news
8th Pay Commission: कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! जुलैपासून पगारात होणार मोठी वाढ, जाणून घ्या किती मिळणार फायदा?

काही प्रकरणांमध्ये महिलांच्या नावावर अर्ज दाखल करून पुरुषांनीच योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे. याशिवाय चुकीची ई-केवायसी, उत्पन्न मर्यादेबद्दलची खोटी माहिती, आयकर भरणारे लाभार्थी तसेच चारचाकी वाहनधारक असल्याची प्रकरणंही समोर आली.

प्रशासनाच्या माहितीनुसार, या अपात्र लाभार्थ्यांनी गेल्या १५ ते २० महिन्यांपासून योजनेचा लाभ घेत शासनाची दिशाभूल केली. त्यामुळेच शासनाला मोठ्या आर्थिक फटक्याचा सामना करावा लागल्याचं सांगण्यात आलं आहे. पडताळणी प्रक्रियेनंतर अशा सर्व लाभार्थ्यांना कायमचं अपात्र घोषित करण्यात आलं आहे.

दरम्यान, शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. मग त्यांनी नियमबाह्य पद्धतीने मिळालेली संपू्र्ण रक्कम संबंधित लाभार्थ्यांकडून वसूल करण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांमध्ये खळखळ उडाली. अनेकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. प्रशासनाकडून पुढील काळात आणखी कठोर पडताळणी केली जाणार असल्याचं सांगितलं आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गरजू आणि पात्र महिलांसाठी सुरू करण्यात आली असली, तरी काही जणांनी नियमांच पालन न करता लाभ घेतला आहे. त्यामुळे भविष्यात अशा योजनांमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी प्रशासन जास्त सतर्क राहणार असल्याचं चित्र दिसत आहे.

Ladki Bahin latest news
Skin Care Tips: स्कीन नेहमीच चमकत राहील, फॉलो करा त्वचारोगतज्ज्ञांनी सांगितेलं सिक्रेट रुटीन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com