Skin Care Tips: स्कीन नेहमीच चमकत राहील, फॉलो करा त्वचारोगतज्ज्ञांनी सांगितेलं सिक्रेट रुटीन

Sakshi Sunil Jadhav

रोज सनस्क्रीन लावा

ढगाळ किंवा पावसाळी वातावरण असलं तरी सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे. UV किरणांमुळे टॅनिंग, पिग्मेंटेशन आणि अॅन्टीएजिंगच्या समस्या वाढू शकतात.

glowing skin

शरीर हायड्रेट ठेवा

पुरेसं पाणी पिणं त्वचेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. शरीरात पाण्याची कमतरता असेल तर त्वचा ड्राय, निस्तेज आणि थकलेली दिसू शकते.

dermatologist skincare routine

अल्कोहोल आणि कॅफीनचं प्रमाण

जास्त प्रमाणात चहा, कॉफी किंवा मद्यपान केल्याने शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. त्यामुळे त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवणं कठीण होतं.

healthy skin tips

नियमित व्यायाम करा

व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि त्वचेच्या पेशींना जास्त पोषण मिळतं. त्यामुळे त्वचा जास्त ग्लोइंग दिसते.

skincare secrets

सक्रिय जीवनशैली ठेवा

दिवसभर अॅक्टीव्ह राहिल्याने शरीर आणि त्वचा दोन्ही निरोगी राहतात. त्यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येण्यास मदत मिळते.

daily skincare routine

तणावावर नियंत्रण ठेवा

जास्त तणावाचा परिणाम त्वचेच्या पोतावर आणि सौंदर्यावर होऊ शकतो. त्यामुळे ध्यान, योग किंवा आवडत्या गोष्टींसाठी वेळ देणं फायदेशीर ठरू शकतं.

daily skincare routine

स्वतःची काळजी घ्या

नियमित विश्रांती आणि सेल्फ-केअरमुळे मानसिक आरोग्यातही सुधारणा होते. त्याचा सकारात्मक परिणाम त्वचेवर लगेचच दिसतो.

daily skincare routine

हेल्दी फॅटी फुड्स

फक्त पाणी पिणंच नाही, तर चांगला फॅट्सयुक्त आहार घेणंही महत्त्वाचं आहे. हे त्वचेला आतून मॉइश्चराइज ठेवण्याचं काम करतं.

daily skincare routine

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

daily skincare routine

NEXT: स्वस्तात मस्त! फक्त 189 रुपयांत 28 दिवसांची टेन्शन संपली, Jio चा धमाकेदार प्लान काय?

, Jio 189 plan
येथे क्लिक करा