

मेटा कंपनीचा मोठा निर्णय
आधी वर्क फ्रॉम होम करा सांगितलं नंतर कामावरुन काढलं
कंपनी ८००० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार
जगातील सर्वात मोठ्या कंपनीपैकी एक असणाऱ्या मेटाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मेटाने आता कर्मचारी कपात करण्यास सुरुवात केली आहे. मेटा जवळपास ८००० कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे. सिंगापुरमधील कर्मचाऱ्यांना कामावरुन काढण्यास सुरुवात कली आहे.
मेटा ८००० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार (Meta Layoff 8000 Employees)
मेटा कंपनी जगभरातून ८००० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकणार आहे. या कर्मचारी कपातीमागचे मुख्य कारण म्हणजे कार्यक्षमता वाढवणे, खर्च कमी करणे आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंसमधील गुंतवणूकीला पाठिंबा देणे आहे. मेटाने आजपासूनच कर्मचारी कपातीला सुरुवात केली आहे.
मेटाने सिंगापूरमधील कर्मचाऱ्यांना पहाटे ४ वाजताच याबाबतची माहिती मिळाली. युरोप आणि अमेरिकेतली कर्मचाऱ्यांचीदेखील कपात केली जाऊ शकते.
आधी वर्क फ्रॉम होमचा मेसेज नंतर कामावरुन काढले
मेटा कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगत आहे. जगभरातील ८००० कर्मचाऱ्यांवर नोकरकपातीची टांगती तलवार आहे. न्यूज एजन्सी ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, नोकरकपातीचा सर्वाधिक फटका इंजिनियरिंग आणि प्रोडक्ट्स टीमला बसणार आहे. वर्षाअखेरपर्यंत ही कर्मचारी कपात होण्याची शक्यता आहे. याआधी कंपनीत ८०,००० कर्मचारी होते.
AI मुळे कर्मचाऱ्यांना फटका
सोमवारी मेटा कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना कळवले की, सुमारे ७००० कर्मचाऱ्यांची एआय संबंधित टीममध्ये नियुक्ती करणार आहे. या टीम प्रोडक्ट्स आणि एजंट्सवर काम करतील. या वर्षी एआयवर १० ट्रिलियव डॉलर्सपेक्षा जास्त खर्च करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.यामुळे मेटा कर्मचारी वर्गात आणि त्यांच्या कामाच्या पद्धतीत मोठे बदल करत आहे. मार्क झुकरबर्ग यांनी कंपनीची कार्यक्षमता वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी कोडिंग आणि इतर कामांसाठी एआय एजंट्सच्या वापरावर भर दिला आहे. त्यामुळे ही कर्मचारी कपात होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.