
लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वजण सोशल मीडियाचा वापर करतात. यात इन्स्टाग्रामवर रिल्स जास्त प्रमाणात पाहतात. इन्स्टाग्रामवर लाखो कन्टेट क्रिएटर्स आहेत. अनेकजण इन्स्टाग्रामवर रिल्स बनवून लाखो रुपयेदेखील कमवतात. आता मेटाने एक नवीन फीचर लाँच केले आहे. मेटाने AI-पावर्ड रील्स ट्रांसलेशन फीचर लाँच केले आहे. आता यामध्ये हिंदी भाषेला सपोर्ट मिळणार आहे. याआधी फक्त इंग्रजी आणि स्पॅनिश भाषेला सपोर्ट मिळत होता.
मेटाच्या या नवीन फीचर्समुळे आता रिल्स जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणार आहे. त्यांना वेगवेगळ्या भाषेतील कॉन्टेट समजणार आहे. यामुळे स्थानिक म्हणजे हिंदी भाषेत रिल्स बनवणाऱ्यांना जगभरात युजर्स मिळणार आहे. आता हिंदी भाषेतील रिल्स इतर भाषेत ट्रान्सलेट करता येणार आहे. हे फीचर इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर उपलब्ध असणार आहे. यामुळे क्रिएटर्स त्यांना ज्या भाषेत वाटेल त्या भाषेत कंटेट शेअर करु शकतात. यामुळे त्यांचे युजर्स वाढतील. परिणामी त्यांची कमाईदेखील जास्त होईल.
आता जगभरातील युजर्संना तुमच्या रिल्स पाहता येणार आहेत. याचसोबत ब्रँड प्रमोशनल कॉन्टेटचे तुम्हाला पैसे मिळणार आहेत. यासाठी मेटाने नवीन एआय टूल सुरु केला आहे. याच्या मदतीने क्रिएटर्स आपल्या रिल्स त्यांच्या भाषेत ट्रान्सलेट करु शकणार आहेत. ते आपल्याला हव्या त्या भाषेत रिल्स पाहू शकतात. हे फीचर इंग्रजी, स्पॅनिश, हिंदी आणि पोर्तुगीज भाषांसाठी आहे.
कसं करता येणार ट्रान्सलेट?
Meta AI तुमच्या रिल्सना ट्रान्सलेट करेन. याचे साउंड, टोन आणि क्रिएटर्सच्या आवाजांना रिप्रोड्युस करेन. यामुळे हा नवीन व्हिडिओ तुम्हाला नॅचरल वाटणार आहे. याचसोबत क्रिएटर्स लिप सिंक फीचरदेखील वापरु शकतात. यासाठी तुम्हाला 'Translated with Meta AI' असं लेबल दिसेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.