Instagram Security: हॅकिंगपासून बचावासाठी इन्स्टाग्राममध्ये करा 'ही' सेटिंग, अकाऊंट राहिल सुरक्षित

Dhanshri Shintre

इन्स्टाग्राम

सध्या बहुतेक लोक इन्स्टाग्राम वापरतात, आणि वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी या प्लॅटफॉर्मवर अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.

अकाउंट हॅक होणे

आजकाल सोशल मीडिया अकाउंट हॅक होणे सामान्य झालं आहे; इंस्टाग्राममध्ये लॉगिन अलर्ट फीचर वापरून याचा प्रतिबंध करता येतो.

सूचना

या फीचरमुळे, तुमच्या इन्स्टाग्राम अकाउंटमध्ये कोण लॉगिन करतो तेव्हा तुम्हाला अॅपमध्ये तत्काळ सूचना प्राप्त होते.

लॉगिन अलर्ट

इन्स्टाग्राममध्ये लॉगिन अलर्ट फीचर वापरण्यासाठी सेटिंग्जमध्ये जाऊन ते सहजपणे सक्रिय करता येते.

पायरी १

सुरुवातीस तुमच्या डिव्हाइसवरील अॅप उघडा, सेटिंग्जमध्ये जा आणि नंतर उजव्या कोपऱ्यातील प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करा.

पायरी २

यानंतर तुम्ही उजव्या बाजूला असलेल्या तीन ओळींच्या मेन्यू आयकॉनवर क्लिक करावे लागेल.

पायरी ३

यानंतर वरच्या भागात दिसणाऱ्या अकाउंट सेंटरवर क्लिक करणे आवश्यक आहे.

पायरी ४

यानंतर तुम्ही खाली दिसणाऱ्या ‘पासवर्ड आणि सुरक्षा’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

पायरी ५

यानंतर लॉगिन अलर्टवर क्लिक करा, खाते निवडा आणि इन-अॅप सूचनांसाठी टॉगल स्विच चालू करा.

NEXT: या' चुका आताच टाळा, नाहीतर तुमचे व्हॉट्सॲप अकाउंट होईल बॅन

येथे क्लिक करा