ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
व्हॉट्सॲप प्रत्येक महिन्यात लाखो व्हॉट्सॲप अकाउंट बॅन करते. तसेच प्रत्येक महिन्यात एक रिपोर्ट जारी करते यामध्ये किती अकाउंट बॅन करण्यात आले याची माहिती दिली जाते.
जर तुम्हीही या चुका केल्या तर तुमचे व्हॉट्सॲप अकाउंट देखील बॅन होऊ शकते, जाणून घ्या.
चॅटिंग करताना समाजात द्वेष पसरवणारे कोणतेही मेसेज करु नका, नाहीतर अकाउंट ब्लॉक होऊ शकते.
व्हॉट्सॲपवर फेक न्यूज फॉरवर्ड करण्याची चूक करु नका, जर कोणी तुमच्या अकाउंटची तक्रार केली तर तुमचे अकाउंट बॅन होईल.
व्हॉट्सॲपवर अश्लील कंटेंट शेअर करण्याची अजिबात चूक करु नका, जर दुसऱ्या युजरने तक्रार केली तर तुमचे व्हॉट्सॲप अॅक्शन घेऊ शकते.
दुसऱ्या युजरच्या परवानगीशिवाय ग्रुपमध्ये युजर जोडू नका, जर तुमच्याबद्दल तक्रार करण्यात आली तर अकाउंट बॅन होईल.
व्हॉट्सॲपवर अनोळखी लोकांना मेसेज पाठवू नका, तक्रार केल्यास व्हॉट्सॲप तुमच्या अकाउंटवर कारवाई करु शकते.