ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
१५ ऑगस्ट १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळालं. आज देशभरात ७९ वा स्वातंत्र्यदिवस साजरा केला जात आहे.
७९ व्या स्वातंत्र्य दिवसानिमित्त आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, १९४७ मध्ये दैनंदिन जीवनातील गोष्टींची किंमत किती होती, जाणून घ्या.
१९४७ मध्ये एक किलो साखरेची किंमत फक्त ४० पैसे होती. तेच २०२५ मध्ये १ किलो साखरेची किंमत ४५ ते ५० रुपये आहे.
ज्या वर्षी देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा प्रति लीटर फुल क्रिम दूधाची किंमत १२ पैसे होती. परंतु आज एक लीटर दूधाची किंमत ६६ रुपये इतकी आहे.
१९४७ मध्ये एक किलो तांदळाची किंमत १२ पैसे होती, तर आज एक किलो तांदळाची किंमत ५० ते १०० रुपये इतकी आहे.
१९४७ मध्ये एका सायकलची किंमत २० रुपये इतकी होती, २०२५ मध्ये साध्या सायकलसाठी देखील ५००० पेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात.
२०२५ मध्ये १० ग्रॅम सोन्याने एक लाखांचा टप्पा पार केला आहे, तर १९४७ मध्ये १० ग्रॅम सोन्याची किंमत ८८.६२ रुपये होती.
१९४७मध्ये एक लीटर पेट्रोलची किंमत फक्त २७ पैसे होती, मात्र आता एक लीटर पेट्रोलची किंमत १०० रुपयांपोक्षाही जास्त आहे.