Driving Licence : ५ वेळा वाहतूक नियम मोडला तर ड्रायव्हिंग लायसन्स सस्पेंड? सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, पाहा सविस्तर

Maharashtra RTO Driving Licence Rules Update : महाराष्ट्रात वर्षभरात ५ किंवा त्यापेक्षा जास्त वेळा वाहतूक नियम मोडल्यास ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित होऊ शकते. तसेच ई-चलनाचा दंड न भरल्यास वाहन ब्लॅकलिस्ट होण्याची शक्यता. जाणून घ्या आरटीओचे नवे नियम.
Maharashtra RTO New Rules Driving Licence Suspension
Maharashtra RTO New Rules Driving Licence Suspension AI Image
Published On: 

वाहतुकीचे नियम वारंवार मोडणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता वर्षभरात ५ किंवा त्यापेक्षा जास्त वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. अशा चालकांचा वाहन चालवण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) निलंबित केला जाऊ शकतो. तसेच वाहनांवरील थकीत दंड न भरल्यास संबंधित वाहनांनाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

महाराष्ट्र परिवहन विभागाने याबाबत राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, वारंवार वाहतूक नियम मोडणाऱ्या चालकांची माहिती गोळा केली जाणार आहे. पाच किंवा त्यापेक्षा जास्त वेळा नियम मोडणाऱ्या चालकांना आरटीओकडून नोटीस पाठवली जाईल. त्यानंतर संबंधित चालकाला आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाईल. त्याचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतरच परवाना निलंबित करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

Maharashtra RTO New Rules Driving Licence Suspension
Gold Rate Today : लग्नसराईच्या काळात सोने-चांदीच्या दरात वाढ; १ तोळ्याची किंमत काय? वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे ताजे दर

केंद्रीय मोटार वाहन नियमांमधील बदल १ जानेवारी २०२६ पासून लागू झाले आहेत. यानुसार दरवर्षी १ जानेवारीपासून वाहतूक नियम मोडल्याची मोजणी पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे मागील वर्षातील नियमभंग पुढील वर्षाच्या मोजणीत धरला जाणार नाही. तसेच जर वारंवार तुमच्या वाहनावरील वाहतूक दंड वेळेत भरले नाही तर ते वाहन ब्लॅक लिस्टमध्ये टाकले जाऊ शकते. अशा वाहनांना आरसी रिन्यू, वाहनाची मालकी बदलणे, पत्ता बदलणे, डुप्लिकेट आरसी आणि फिटनेस प्रमाणपत्र मिळवणे यांसारख्या कामांमध्ये अडथळे येऊ शकतात. तसेच पीयूसी प्रमाणपत्र मिळवतानाही अडचणी निर्माण होऊ शकतात.

Maharashtra RTO New Rules Driving Licence Suspension
Bribe Case : पोलीस विभागात खळबळ! कर्मचाऱ्याला ४०००० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं

ई-चलन किंवा वाहतूक दंड मिळाल्यानंतर ४५ दिवसांच्या आत त्याची रक्कम भरणे अपेक्षित आहे. या मुदतीत दंड न भरल्यास संबंधित प्रकरण न्यायालयात पाठवले जाऊ शकते. मात्र, ई-चलनावर चालकाची माहिती उपलब्ध नसेल तर केवळ वाहनाच्या मालकावर थेट कारवाई केली जाणार नाही. आधी चालकाची ओळख तपासली जाईल. त्यामुळे वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करावा आणि वाहनावरील दंड वेळेत भरावा, असे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.