Ladki Bahin Yojana : १५०० की ३००० रुपये? खात्यात किती पैसे येणार; आज मोठा निर्णय होणार

Ladki Bahin Yojana July august Instalment : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना जुलै महिन्याचा ₹१५०० हप्ता मिळणार की जुलै-ऑगस्टचे एकत्र ₹३००० जमा होणार? आज होणाऱ्या महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
Ladki Bahin Yojana July august Instalment
Ladki Bahin Yojana July august Instalment साम टीव्ही मराठी
Published On

Ladki Bahin Yojana, Maharashtra Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांच्या नजरा आता राज्य सरकारच्या पुढील निर्णयाकडे लागल्या आहेत. आगामी हप्त्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यात नक्की किती महिन्यांचे पैसे जमा होणार? एकाच वेळी ३ हजार रुपये मिळणार की दरमहा मिळणारे १५०० रुपयेच येणार, याबद्दल संपूर्ण राज्यात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वाच्या बैठकीत यासंदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार?

या योजनेअंतर्गत पात्र महिलांना जून महिन्याचा हप्ता १५ जुलैच्या सुमारास खात्यात जमा करण्यात आला होता. त्यामुळे जुलै महिन्याचा हप्ता देखील १५ ऑगस्टपर्यंत महिलांच्या बँक खात्यात जमा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Ladki Bahin Yojana July august Instalment
पेट्रोलवर प्रति लिटर ₹३.५ आणि डिझेलवर प्रति लिटर ₹२४ कर, सरकारने घेतला मोठा निर्णय

रक्षाबंधनाला एकत्र २ हप्ते मिळण्याची शक्यता!

जर १७ ऑगस्टपर्यंत जुलै महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला नाही, तर सरकारकडून जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्यांचे एकत्र २ हप्ते (एकूण ३००० रुपये) दिले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी येणारा रक्षाबंधनाचा सण लक्षात घेता, राज्य सरकार महिलांना ही विशेष भेट देण्याच्या विचारात असल्याचे म्हटले जात आहे. परंतु, याबाबत अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत योजनेसाठी लागणाऱ्या निधीचे वितरण आणि एकत्र हप्ते देण्याबाबत सविस्तर चर्चा होऊन योग्य तो निर्णय घेतला जाऊ शकतो.

Ladki Bahin Yojana July august Instalment
पाकिस्तानचे झाले २ तुकडे? नव्या देशाची स्थापना, जाहीर केला स्वतःचा स्वातंत्र्यदिन; शाहबाज शरीफ सरकार हादरले

ई-केवायसीनंतर १ कोटी ६६ लाख महिला ठरल्या पात्र

राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत पारदर्शकता आणण्यासाठी आणि गरजू महिलांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया लागू केली होती. या प्रक्रियेनंतर राज्यातील तब्बल ८० लाख अर्जदार महिला अपात्र ठरल्या आहेत. मात्र, दुसरीकडे १ कोटी ६६ लाख महिला या योजनेसाठी पूर्णपणे पात्र ठरल्या आहेत. या पात्र महिलांच्या खात्यात लवकरच जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे पैसे जमा केले जातील, असे संकेत प्रशासनाकडून मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com