

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी
नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच जमा होणार
९० लाख शेतकऱ्यांना ₹२००० मिळणार
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आता २००० रुपये जमा होणार आहेत. नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधीही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना राबवली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना वर्षभरात ६००० रुपये दिले जातात. आता या योजनेचा हप्ता जमा केला जाणार आहे.
नमो शेतकरी योजनेचा ८वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे. ८वा हप्ता गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला आहे. शेतकरी तीन महिन्यापासून या हप्त्याची वाट पाहत आहेत. आता या आठवड्यातच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे.
नमो शेतकरी योजनेसाठी निधी मंजूर (Namo Shetkari Yojana Installment Approved)
राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. या योजनेसाठी १,७७४ कोटींचा निधी मंजूर केला आहे. राज्यातील एकूण ९० लााख ३४ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २००० रुपये जमा केले जाणार आहेत.
केंद्र सरकारने पीएम किसान योजना सुरु केली आहे.त्याच धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. या दोन्ही योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षभरात प्रत्येक ६००० रुपये दिले जातात. म्हणजेच राज्यातील शेतकऱ्यांना १२००० रुपये मिळतात.
शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता लाभार्थ्यांना याच आठवड्यात दिला जाणार आहे. नमो शेतकरी योजनेचा ८वा हप्ता डिसेंबर महिन्यात जमा होणार होता. मात्र, हा हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना ३ महिने वाट पाहावी लागली. आता योजनेसाठी निधी मंजूर झाला असून वितरणासदेखील परवानगी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.