Government Scheme: महाराष्ट्र सरकारची खास योजना! या नागरिकांना मिळतात ₹३०००; अटी काय? वाचा सविस्तर

Mukhyamantri Vayoshri Yojana: महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु केली आहे. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना ३००० रुपये दिले जातात. यामुळे नागरिकांना फायदा होणार आहे.
Government Scheme
Government SchemeSaam Tv
Published On
Summary

राज्य सरकारची मुख्यमंत्री वयोश्री योजना

ज्येष्ठ नागरिकांना मिळणार ३००० रुपये

अर्ज कोणी आणि कसा करावा?

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारसोबतच राज्य सरकारनेही अनेक योजना सुरु केल्या आहेत. राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु केली आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजनेत ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेसाठी अर्थसंकल्पातदेखील तरतूद केली जाते.

Government Scheme
Government Scheme : तिसरं अपत्य झाल्यास सरकार देणार २५,००० रुपये; या राज्याने घेतला निर्णय, वाचा नेमकी योजना काय आहे?

मुख्यमंत्री वयोश्री योजना (Mukhyamantri Vayoshri Yojana)

मुख्यमंत्री वयोश्री योजनेत ज्येष्ठ नागरिकांना प्रबोधन व प्रशिक्षणाकरता एकरकमी ३००० रुपये दिले जातात. राज्यातील ६५ आणि त्यापेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना आर्थिक मदत मिळावी. त्यांना सध्याच्या परिस्थितीत आयुष्य जगण्यासाठी मदत मिळते. वयोमानानुसाक येणारे अंपगत्व किंवा अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी मदत केली जाते. जेणेकरुन ज्येष्ठ नागरिक त्यांना हव्या त्या गोष्टी खरेदी करु शकतील.

अटी

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी आधार कार्ड किंवा इतर कोणतेही ओळखपत्र ग्राह्य धरले जाईल.

लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २ लाखांपेक्षा कमी असावे.

लाभार्थी व्यक्तीने मागील तीन वर्षात कोणत्याही सरकारी स्त्रोतांकडून उपकरणे विनामूल्य प्राप्त केलेले नसावे.

पार्थ लाभार्थ्यांचे बँक खाते आणि आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे. त्यांच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा केले जातात.

Government Scheme
Government Scheme: सरकारची खास योजना! माजी सैनिकांच्या मुलीच्या लग्नासाठी मिळणार १ लाख रुपये

लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, ओळखपत्र, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र,घोषणापत्र, बँक खाते पासबुक, मोबाईल नंबर, पासपोर्ट साइज फोटो आवश्यक आहे. तुम्हाला तुमचा अर्ज या कागदपत्रांसह समाजकल्याण विभागाकडे सादर करायचा आहे.

Government Scheme
Government Scheme: २५ लाखांपर्यंत कॅशलेस उपचार अन् मोफत औषधे; सरकारची खास योजना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com