

एलपीजी सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आजही घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींप्रमाणे स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीतही दिलासा मिळेल, अशी अपेक्षा ग्राहकांना होती. पण तेल कंपन्यांनी सध्यातरी दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
याआधी १ जुलै २०२६ रोजी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात १८३.५० रुपयांची मोठी कपात करण्यात आली होती. बऱ्याच कालावधीनंतर झालेली ही मोठी दरकपात हॉटेल, रेस्टॉरंट आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी दिलासादायक ठरली होती. पण १४. २ किलोच्या घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नव्हता.
सध्या देशातल्या प्रमुख शहरांमध्ये घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर वेगवेगळे आहेत. दिल्लीत १४. ३ किलोचा सिलेंडर ९४२ रुपयांना उपलब्ध असून मुंबईत त्याची किंमत ९४१.५० रुपये आहे. चेन्नईमध्ये हा सिलेंडर ९५७.५० रुपयांना मिळत असून कोलकात्यामध्ये त्याची किंमत ९६८ रुपये आहे. तर पाटणामध्ये घरगुती सिलेंडरची किंमत सर्वात जास्त १०३१.५० रुपये आहे.
व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतींबाबत पाहिले तर दिल्लीत १९ किलोचा सिलेंडर २९३० रुपयांना मिळत आहे. मुंबईत त्याची किंमत २८८५.५० रुपये, कोलकात्यात ३,०८१.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ३,१०६ रुपये इतकी आहे. पाटणामध्ये व्यावसायिक सिलेंडरचा दर ३,२२७ रुपये असून तो प्रमुख शहरांमध्ये सर्वात जास्त आहे.
एलपीजीच्या किमतीत याआधी वाढ होण्यामागे अमेरिका-इराण-इस्रायल संघर्ष आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील पुरवठ्यावर झालेला परिणाम हे प्रमुख कारण मानले गेले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.