Sakshi Sunil Jadhav
किडनी आपल्या शरीरातले विषारी द्रव्ये बाहेर टाकण्याचं काम करते. पण किडनीने काम कमी करायली लागली तर शरीर काही सुरुवातीची लक्षणे तुम्हाला जाणवू शकतात. जी पुढीलप्रमाणे आहेत.
सकाळी उठल्यावर चेहरा किंवा डोळ्यांभोवती सूज दिसत असेल तर ते किडनीच्या कार्यातल्या बिघाडाचे लक्षण असू शकते.
सकाळची लघवी रोज फेसाळ किंवा बुडबुड्यांनी भरलेली दिसत असेल तर ती प्रोटीन लघवीत जाण्याचे संकेत असू शकतात.
सकाळी उठल्यावर त्वचा खूप कोरडी वाटणे किंवा सतत खाज येणे हेही किडनीच्या समस्येचे संकेत असू शकतात.
किडनी नीट काम करत नसेल तर शरीरातले विषारी घटक मेंदूपर्यंत पोहोचू शकतात. यामुळे लक्ष केंद्रित करण्यात अडचण, विस्मरण, चक्कर येणे किंवा गोंधळल्यासारखं वाटू शकतं.
तोंडातून सतत दुर्गंधी येणे किंवा अन्नाची चव धातूसारखी वाटणे हे किडनीच्या आजाराचे लक्षण असू शकते. रक्तात युरिया आणि इतर विषारी द्रव्ये वाढल्यामुळे अशी समस्या निर्माण होते.
डायबिटीज आणि हाय ब्लड प्रेशर असलेल्या लोकांमध्ये किडनी खराब होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे रोज रक्त आणि लघवीच्या तपासण्या करून किडनीची कार्यक्षमता तपासा.
किडनीचे आजार सुरुवातीला गंभीर वेदना न देता हळूहळू वाढू शकतात. म्हणून सूज, लघवीतील बदल किंवा त्वचेतील बदल दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हा लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. वरीलपैकी कोणतेही लक्षण सतत जाणवत असल्यास स्वतः उपचार न करता नेफ्रॉलॉजिस्ट किंवा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.