LPG Price: होळीआधी सर्वसामान्यांना झटका! LPG गॅसच्या किंमती वाढल्या; वाचा ताजे दर

LPG Cylinder Price Hike: सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एलपीजी गॅसच्या किंमतीत वाढ झाली आहे. व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती २८ रुपयांनी महागल्या आहेत.
LPG Price Hike
LPG Price HikeSaam Tv
Published On
Summary

एलपीजी गॅसच्या किंमती बदलल्या

व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत वाढ

लहान व्यावसायिकांना फटका

देशातील तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅसच्या नवीन किंमती जाहीर करतात. आजदेखील १ मार्च रोजी एलपीजी गॅसच्या किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत. आज एलपीजी गॅसच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे व्यावसायिकांच्या खिशाला चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे.

LPG Price Hike
Gas Cylinder Expiry: तुमचा गॅस सिलेंडर एक्सापायर तर झाला नाही ना? आताच असं तपासा, अन्यथा...

एलपीजी गॅसच्या किंमती २८ रुपयांनी वाढल्या (LPG Cylinder Price Hike)

व्यावसायिक एलपीजी गॅसच्या किंमती वाढल्या आहेत.त्यामुळे रेस्टॉरंट, हॉटेल आणि लहान व्यवासायिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. आता तुम्हाला १९ किलो वजनाचा एलपीजी गॅस सिलेंडर १७६८.५० रुपयांना मिळणार आहे. याआधी हा दर १७४०.५० रुपये होता. या दरात २८ रुपयांनी वाढ झाली आहे.

संपूर्ण देशभरात कमर्शियल एलपीजी गॅसच्या किंमती बदलल्या आहेत. या किंमतीत २८ रुपयांनी वाढ झाली आहे. दरम्यान, घरगुती गॅसच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. घरगुती गॅसच्या किंमती न बदलल्याने सर्वसामान्यांना, गृहिणींना दिलासा मिळाला आहे.

LPG Price Hike
EPFO कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! १२ वर्षांपूर्वीचे नियम केले पुन्हा लागू; पेन्शन वाढण्याची शक्यता

गॅसच्या किंमती वाढल्या

घरगुती गॅसच्या किंमती मुंबईत ८५२.५० रुपये आहेत. घरगुती गॅस हा १४.२ किलोचा असतो. दिल्लीत घरगुती गॅसच्या किंमती ८५३ रुपये आहेत. कोलकत्त्यात घरगुती गॅसच्या किंमती ८७९ रुपये आहेत. चेन्नईत घरगुती गॅसच्या किंमती ८६८.५० रुपये आहेत.

LPG Price Hike
Gas Cylinder Blast : कारमध्ये गॅस भरताना स्फोट; जामनेरमधील घटना, सुदैवाने जीवितहानी टळली

एलपीजी गॅसच्या किंमती कशा निश्चित होतात?

एलपीजी गॅसच्या किंमती या अनेक घटकावर अवलंबून असतात. हे दर आयपीपीद्वारे ठरवले जातात. यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारातील गॅसच्या किंमती, डॉलर रुपया आणि मालवाहतून याचसोबत कर यावर हे दर ठरवले जातात. कर आणि लॉजिस्टिकचा खर्च हा राज्यानुसार बदलतो. त्यामुळे एलपीजीच्या किंमतींमध्ये फरक पडतो.

LPG Price Hike
Success Story: ९ तासांची शिफ्ट, कॅबमध्ये अभ्यास, २३ लाखांच्या पगाराची नोकरी सोडली, पाचव्या प्रयत्नात IAS; काजल जावला यांचा प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com