Sakshi Sunil Jadhav
आता एलपीजी गॅस सिलेंडर आला आहे. सकाळच्या चहापासून रात्रीच्या जेवणापर्यंत स्वयंपाकासाठी गॅसवरच अवलंबून राहावे लागते.
अनेकांना गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट काय असते आणि ती कशी तपासायची याची माहिती नसते.
एक्सपायर झालेल्या सिलेंडरमधून गॅस लीक, आग लागणे किंवा ब्लास्ट होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो.
एलपीजी सिलेंडरच्या वरच्या भागावर असलेल्या लोखंडी रिंगवर एक्सपायरी कोड लिहिलेला असतो.
A – जानेवारी ते मार्च, B – एप्रिल ते जून, C – जुलै ते सप्टेंबर, D – ऑक्टोबर ते डिसेंबर असे लिहिले असते. त्याप्रमाणे तुम्ही सिलेंडर तपासा.
B-29 कोड असलेला सिलेंडर 2029 मध्ये एप्रिल ते जूनपर्यंत वापरण्यास सुरक्षित असतो.
कालांतराने सिलेंडरची धातू कमकुवत होते, वाल्वमध्ये बिघाड होतो आणि गॅस लीक होण्याची शक्यता वाढते.
सिलेंडर एक्सपायर असल्यास त्वरित गॅस एजन्सीशी संपर्क साधून तो बदलून घ्यावा, कारण थोडीशी निष्काळजी मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरू शकते.